North West Lok Sabha Constituency : भाऊ फक्त सही शिक्क्यांपुरतेच, भैयाच करतात काम

लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

148
North West Lok Sabha Constituency : भाऊ फक्त सही शिक्क्यांपुरतेच, भैयाच करतात काम

पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाच्यावतीने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ही केवळ गजानन किर्तीकर यांचे पुत्र म्हणून केलेली नसून किर्तीकर यांच्या लोकसभेचे संपूर्ण कामकाज हे अमोलच पाहत होते. आणि मागील दोन टर्ममध्ये गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी अमोल किर्तीकरच मतदारांचे प्रश्न हाताळत होते. त्यामुळे शिवसैनिकांच्या मते भाऊ हे फक्त सही आणि शिक्क्यांपुरतेच होते. सगळे काम तर भैयाच करत होते अशी प्रतिक्रियाच शिवसैनिकांकडून ऐकायला मिळत आहे. (North West Lok Sabha Constituency)

लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या मतदार संघातून महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उबाठा (UBT) पक्षाचे अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल किर्तीकर यांनी आता लोकसभा मतदार संघात प्रभात फेरी काढून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी तसेच बैठका घेण्यावर भर दिला आहे. परंतु महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर होत नाही. या मतदार संघात शिवसेना पक्षाच्यावतीने आमदार रविंद्र वायकर, शरद पोंक्षे, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे. (North West Lok Sabha Constituency)

परंतु उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील उबाठा (UBT) शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, गजानन किर्तीकर हे खासदार असले तरी त्यांचे संपूर्ण कामकाज हे अमोल भैया किर्तीकरच पाहत होते. अमोल भैयाच जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यानुसार कामकाज करत असत. गजानन (भाऊ) किर्तीकर हे केवळ सही आणि शिक्यांपुरतेच होते. प्रत्यक्षात जनतेच्या संपर्कात भाऊ नव्हे तर भैयाच असायचे. त्यामुळेच गजानन किर्तीकर हे शिवसेनेत गेल्यानंतर अमोल भैया त्यांच्यासोबत गेले नाही तर ते उबाठा शिवसेनेसोबतच राहिले. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Reliance Q4 Results : १ लाख कोटींचा नफा नोंदवणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी)

पक्ष वेगळे असले तरी नातेसंबंधाने दोघेही बांधलेले

अमोल भैयांना हा संपूर्ण लोकसभा मतदार संघ परिचित असून उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथमच त्यांची उमेदवारी जाहीर केली. यामागे त्यांचे या मतदार संघात असलेला जनसंपर्क. अमोल किर्तीकर यांच्याशिवाय अन्य कुणाचाही या मतदार संघात प्रभाव नसल्याने उद्धव ठाकरे यांनी अमोल भैयांना उमेदवारी जाहीर केली. अमोल भैया हे भाऊंचे पुत्र होते म्हणून त्यांना उमेदवारी दिली नाही तर या संपूर्ण मतदार संघातील खडानखडा माहिती तसेच दांडगा जनसंपर्क असल्यानेच भैयाला उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

मात्र, अमोल किर्तीकर यांना या मतदार संघाची ओळख परेड करून घेण्याची गरज नसून त्यांची बांधणी आणि प्रचार जोरात सुरु झाला आहे. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर हे शिवसेनेत आणि अमोल किर्तीकर हे उबाठा शिवसेनेत असले तरी दोघांचे कार्यालय आणि कर्मचारी वर्ग एकच आहे. पक्ष वेगळे असले तरी नातेसंबंधाने दोघेही बांधलेले आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईमुळे काही प्रमाणात गजानन किर्तीकर यांचे बापाचे काळीज थोडेसे दुखावले गेले आहे. त्यातूनच त्यांनी भाजपावरच टीका केली. त्यामुळे गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनाने ते अमोल किर्तीकर यांच्यासोबतच आहे. अमोल निवडून आल्यास आपण स्वत:च निवडून आलो असे होईल आणि घरातच खासदार राहील असे असे भाऊंचा एकप्रकारचा विचार असावा असेही शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.