Sanjay Singh : आपचे खासदार संजय सिंग यांचा उर्मटपणा; सभापतींनी निलंबन करून सभागृहाबाहेर जाण्यास सांगूनही केले दुर्लक्ष

90
  • वंदना  बर्वे

दिल्ली सरकारच्या विरोधातील केंद्राच्या अध्यादेशाला राज्यसभेच्या सभापटलावर ठेवण्यास आम आदमी पक्ष कडाडून विरोध दर्शवित असताना सभापती जगदीप धनखड यांनी आपचे खासदार संजय सिंग यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केले. यानंतर उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी संजय सिंग सभागृह सोडून बाहेर जाण्याची वारंवार विनंती केली. परंतु, संजय सिंग आपल्या जागेवर शेवटपर्यंत बसून राहिले.

सविस्तर वृत्त असे की, मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत असताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग थेट वेलमध्ये आले. सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना परत जागेवर जाण्यास सांगितले. परंतु, सिंग यांनी वेलमध्ये आपला विरोध सुरूच ठेवला. यामुळे, सभापती धनखड यांनी संजय सिंग यांच्यावर कठोर कारवाई करीत संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या कारवाईला विरोध दर्शवित निलंबन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

(हेही वाचा Manipur Violence : मणिपूरवर चर्चा करायला सरकरची तयारी – अमित शाह)

निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही संजय सिंग आपल्या जागेवर बसून राहिले. उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी सिंग यांना निलंबन झाल्यामुळे बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, सिंग आपल्या जागेवरून सरकले सुध्दा नाही. याच कारणामुळे सिंग यांनी राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. सिंग जागेवरून हलत नसल्यामुळे त्यांनी राज्यसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केले.

आपचे खासदार संजय सिंग निलंबनानंतरही जागेवरून हलत नसल्यामुळे ते रात्रभर सभागृहातच राहणार आहेत काय? असा प्रश्न पत्रकारांना पडला. राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक विरोधी पक्षनेत्याच्या दालनात झाली. जवळपास सर्व पक्षांचे बहुतांश नेते बैठकीसाठी गेले असताना संजय सिंग मात्र आपल्या जागेवर चिकटून बसले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.