‘एका विशिष्ट समुदायावरच कारवाई होते’; छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

72

राज्यातील सत्तांतरानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आली आहे.

मुश्रीफ म्हणाले की, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरुन मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरु आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीच्या कारवाया एका विशिष्ट समुदायाच्या लोकांवरच केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

( हेही वाचा: शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणारे २८२ पैकी १७५ प्रतिनिधी सदस्य शिंदेंकडे; उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच )

विशिष्ट समाजावर कारवाई केली जाते

मुश्रीफ पुढे म्हणाले की, ईडीने याआधीही छापेमारी केली आहे. आता पुन्हा ईडीने छापेमारी का केली हे समजले नाही. कोणत्या हेतूने ही कारवाई केली हेही कळत नाही. याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर येईन, असेही मुश्रीफ म्हणाले. किरीट सोमय्या म्हणतात, अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार आहे. यावरुन विशिष्ट समाजावर कारवाई केली जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.