ASI : मथुरेत कृष्ण मंदिर पाडून औरंगजेबाने बांधली मशीद; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची माहिती

260

मथुरेतील केशवदेवाचे मंदिर सुमारे ५००० वर्षांपूर्वी बांधले गेले होते. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाचे पणतू व्रज आणि व्रजनाभ यांनी राजा परीक्षित यांच्या मदतीने मथुरेत केशदेवाचे मंदिर बांधले होते. मुघल औरंगजेबाने १६७० मध्ये मथुरेतील केशवदेवाचे मंदिर पाडण्याचा हुकूम जारी केला. त्यानंतर तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. हिंदू मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर बांधलेल्या मशिदीत औरंगजेबाने स्वतः नमाज अदा केल्याचे मानले जाते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) माहितीच्या अधिकाराखाली आलेल्या अर्जात म्हटले आहे.

(हेही वाचा Mufti Salman Azhari : मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला रातोरात गुजरातमध्ये हलवले; घाटकोपरमध्ये तणावपूर्व शांतता)

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने मुघल जुलमी औरंगजेबाने मथुरेतील कृष्णजन्मभूमी पाडल्याबद्दल 1920 च्या ऐतिहासिक नोंदींवर आधारित उपरोक्त माहिती दिली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंग यांनी ASI च्या अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञाकडे माहितीचा अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारले होते.  १६७० मध्ये शाही ईदगाह बांधण्यासाठी मथुरेतील कृष्णजन्मभूमी जेथे केशदेवाचे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले त्याबद्दल त्यांनी विशिष्ट माहिती मागवली होती. सिंग यांनी ASI ला नोव्हेंबर 1920 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून तपशील देण्यास सांगितले होते.

मथुरेतील हा वाद १३.३७ एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे. श्री कृष्णजन्मभूमीच्या मालकीची १०.९ एकर जमीन आहे, तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमीन आहे. संपूर्ण जमीन हिंदूंच्या मालकीची आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.