Lok Sabha Election 2024 : मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुलुंड टर्मिनस, झोपडपट्टी मुक्त मुंबई, मिहीर कोटेचा यांची घोषणा

129
Lok Sabha Election 2024 : मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

‘जय श्री राम’, ‘मिहीर भाई आगे बढो हम तुम्हे साथ है ‘, ‘अब की बार चारसो पार’, अशी अविश्रांत घोषणाबाजी करत विक्रोळीच्या टागोर नगरात धडकलेल्या जनसागराचे आशिर्वाद घेत ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी शुक्रवारी दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आशिर्वाद देण्यासाठी उसळलेल्या जनसागराला उद्देशून हे ‘ मोदी मॅजिक’ आहे, अशी प्रतिक्रिया मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केली. हा प्रतिसाद पाहून जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान तर मोदी यांचा सैनिक या नात्याने मला ईशान्य मुंबईचा खासदार म्हणून विजयी करण्याचा निश्चय केल्याचे स्पष्ट झाले, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, माझी खासदार किरीट सोमय्या, खासदार मनोज कोटक, राज्यसभा खासदार विकास महात्मे, माजी मंत्री प्रकाश मेहता, विधानपरिषदेचे भाजपचे गटनेते प्रविण दरेकर, आमदार पराग शहा, आमदार राम कदम यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं (आठवले गट), रासप, पीआरपी आणि अन्य घटक पक्षांच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोक प्रतिनिधींनी या जनसागरात सामील होत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मिहिर कोटेचा यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या महशक्तीची झलक दाखवून दिली. (Lok Sabha Election 2024)

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, मोदीजींवर मुंबईकरांचे प्रचंड प्रेम आहे आणि यावेळी मोदीजींना मुंबईतून प्रचंड यश मिळेल. मुंबईतील सहाही जागांवर भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. मिहिर कोटेचा प्रचंड मतांनी निवडून येतील. इथे महविकास आघाडीचे कुठलेही आव्हान दिसून येत नाही. लोकांच्या मनात मोदीजी आहेत आणि तेच आव्हान महाविकास आघाडी समोर आहे. त्यामुळे कोटेचा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

मुलुंड टर्मिनस, झोपडपट्टी मुक्त मुंबई, मिहीर कोटेचा यांची घोषणा

निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी सांगितले, माझे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मोठे आहे, त्यात बऱ्याच गोष्टी आणि विषय आहेत. मात्र निवडून येताच कोकणवासीयांसाठी मुलुंड टर्मिनस, डम्पिंगमुक्त मुंबई आणि झोपडपट्टीमुक्त ईशान्य मुंबई हे तीन विषय मी प्राधान्याने मार्गी लावेन. ईशान्य मुंबईतील बहुसंख्य कोकणवासियांच्या सुविधेसाठी मुलुंड टर्मिनस हे माझे स्वप्न आहे. तर विक्रोळी, देवनारवासियांचे आरोग्य लक्षात घेता येथील दोन्ही डम्पिंगग्राऊंड कायमस्वरूपी बंद करणार. तसेच या विभागातील झोपडपट्ट्यांचा विकास करून तेथील रहिवाशांना तिथल्यातिथे हक्काचे घर उपलब्ध करून देणे, ही माझी प्राथमिकता असेल. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब)

भाषिक वाद विरोधकांचा, जनतेचा नाही

प्रचारासाठी विरोधकांकडे मुद्दे नाहीत. केलेल्या कामांची जंत्री नाही. त्यामुळे विरोधक भाषा, जात, धर्म या विषयावर वाद निर्माण करत आहेत. मात्र हा वाद विरोधक करत आहेत जनता करत नाहीये. मोदीजींचे काम आणि शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारने केलेलं काम घेवून मी जनतेसमोर जात आहे, असेही त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

कोळी नृत्य, लेझिम, फटाक्यांच्या आतषबाजीने पदयात्रेचे स्वागत

टागोर नगरच्या कै. भालचंद्र कांडरकर चौकातील आराध्या बिल्डिंगपाशी शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ईशान्य मुंबईतील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या पक्षाचे ध्वज घेत एकवटू लागले. सुरुवातीला कार्यकर्त्यांचे स्वागत कोळी नृत्याने झाले. पुढल्या दोन तासांत कांडरकर चौकात महायुतीची महाशक्ती एकवटली. एकीकडे ‘जय श्रीराम’, ‘मिहिर भाई आगे बढो हम तुम्हे साथ है’, ‘अब की बार चारसो पार, नरेंद्र मोदी तिसरी बार’ अशा घोषणाबाजीने टागोर नगर दुमदुमत होते तर दुसरीकडे पारंपारिक वेशात पदयात्रेत सहभागी झालेल्या माहिला कार्यकर्त्यांनी लेझिमवर ताल धरलेला दिसत होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, भाजपा मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्यासह उमेदवार मिहिर कोटेचा प्रचार रथावर स्वार झाले तेव्हा फटाक्यांची आतषबाजी आणि उपस्थित जनशक्तीची घोषणाबाजी टिपेला गेली. कोटचा यांच्या पदयात्रेवर पावलापावलांवर पुष्पवृष्टी होत होती. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.