राज्यातील ९ लाख महिला घेत आहेत Government Schemes चा बेकायदेशीर लाभ

83

राज्य सरकारने निवडणुकीआधी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे याशिवाय सहा लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची आणखी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ‘नमो शेतकरी’ (Namo shetkari yojana) आणि ‘लाडकी बहीण योजना’ (ladki bahin yojana) या दोन्ही योजनांचा काहींनी लाभ घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. (Government Schemes)

(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद, बंगळुरूत रस्त्या रस्त्यावर जल्लोष)

राज्य सरकारी सेवेतील अडीच हजार महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ८ लाख ८२ हजार ५०० महिलांनी चुकीच्या मार्गाने ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा लाभ घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. शासकीय योजनांचा सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ घेता येत नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट असतानाही अनेकांनी अनधिकृतपणे पैसे उचलले आहेत. त्यामुळे शासनाकडून लाभार्थ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईची शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, ही योजना सुरूच राहील. सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात यापुढेही रक्कम जमा होत राहील, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. (Government Schemes)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.