Los Angeles मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात !

Los Angeles मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात !

76
Los Angeles मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात !
Los Angeles मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात !

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या सरकारच्या इमिग्रेशन धोरणाविरुद्ध गेल्या चार दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांची कुमक तैनात केली होती. मात्र त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालं आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी नॅशनल गार्डच्या मदतीसाठी सुमारे ७०० ड्युटी मरीन कमांडो पाठवले आहेत. त्यामुळे आता कॅलिफोर्नियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Los Angeles)

हेही वाचा-देशात Corona च्या सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांवर ! गेल्या २४ तासांत तिघांचा मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुरु करण्यात आलेल्या इमिग्रेशन मोहिमेविरोधात लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) गेल्या चार दिवसांपासून आंदोलन भडकले आहे. बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे टाकल्यानंतर तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड तैनात केले. त्यामुळे आंदोलनाचा जोर आणखी वाढला. आता ट्रम्प यांनी शहरात २,१०० नॅशनल गार्ड सैनिकांच्या मदतीसाठी ७०० मरीन कमांडो तैनात केले आहेत. (Los Angeles)

हेही वाचा- ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारा MS Dhoni ११ वा भारतीय !

दरम्यान, आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांनी अश्रुधुराचा वापर, स्फोटके आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. प्रत्युत्तर देताना, आंदोलकांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक केली आणि कचरा जाळून रस्ते अडवले. शुक्रवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांवर छापे टाकले आणि परिसरात तणाव वाढला आहे. या छाप्यांमध्ये लॉस एंजेलिसच्या (Los Angeles) फॅशन डिस्ट्रिक्ट आणि होम डेपोमध्येही छापे टाकण्यात आले. एका आठवड्यात शहरात अटक केलेल्या स्थलांतरितांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. (Los Angeles)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.