Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत महाराष्ट्रातील ७ जणांवर काळाचा घाला !

Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत महाराष्ट्रातील ७ जणांवर काळाचा घाला !

130
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत महाराष्ट्रातील ७ जणांवर काळाचा घाला !
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत महाराष्ट्रातील ७ जणांवर काळाचा घाला !

अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार घेतील व जखमींशी संवाद साधतील. हॉस्टेलच्या जखमी डॉक्टरांशीही पंतप्रधान मोदी संवाद साधतील. (Ahmedabad Plane Crash)

या अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील एकूण सात जणांनी जीव गमावला आहे. हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे. त्यांची नावं दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), रोशनी सोनघरे (डोबिंवली) आणि मैथिली पाटील (नवी मुंबई) अशी आहेत. (Ahmedabad Plane Crash)

दीपक पाठक
दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होता. त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. आज सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केलं होतं. (Ahmedabad Plane Crash)

सुमित सभरवाल
क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता. को-पायलट सुमित सबरवाल याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल याचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमितच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. (Ahmedabad Plane Crash)

महादेव पवार आणि आशा पवार
मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचा विमान अपघातात समावेश आहे. महादेव पवार ( वय ६७) आशा पवार ( वय ५५) यांनी त्यांचा जीव गमावला आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे. (Ahmedabad Plane Crash)

रोशनी सोनघरे
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. (Ahmedabad Plane Crash)

अपर्णा महाडीक
चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (35) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे. (Ahmedabad Plane Crash)

मैथिली पाटील
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश आहे. क्रू मेंबर्समध्ये हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश आहे. मैथालीच्या पश्चात आई – वडील , बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी सुरु केली होती. आजच्या घटनेनं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. (Ahmedabad Plane Crash)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.