राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव ठेवणार असल्याचं ते म्हणाले. (Uday Samant)
जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये ५०० एकर भूखंड राखीव
जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ pic.twitter.com/NhURAfj1A8
— Uday Samant (@samant_uday) June 7, 2025
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. उदय सामंत यांनी जर्मनीतही मराठी माणूस महाराष्ट्राची संस्कृती घेऊन जगत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यक्रमात जाहीर केला. (Uday Samant)
जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये ५०० एकर भूखंड राखीव
जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ
आज जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत… pic.twitter.com/SbKMQolYdk
— Uday Samant (@samant_uday) June 7, 2025
जर्मनीतून महाराष्ट्रात येणाऱ्या अशा प्रकल्पांचं महाराष्ट्रात मनापासून स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सुविधा दिल्या जातील. तसेच जर्मनीतील मध्यम उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी जर्मनीतल्या मराठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी केले. (Uday Samant)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community