
जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा-Pahalgam मधील दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांची दहशतवाद्यांकडून हत्या ! Video Viral
या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. (Pahalgam Terrorist Attack)
दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, गुजरातसह दोन परदेशातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता यातील १६ मृतांची नावे समोर आली आहेत. तसेच यात १० जण जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन परदेशी नागरिकांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : २६ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 2 नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश
तसेच या हल्ल्याच्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यातील १६ महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी गेला होता. सुदैवाने या सर्व महिला सुरक्षित आहे. गोळीबार होण्याआधी काही क्षणापूर्वी तिथून हा ग्रुप निघाला होता. (Pahalgam Terrorist Attack)
मृत व्यक्तींची नाव (Pahalgam Terrorist Attack)
मंजूनाथ शिवम – कर्नाटक
विनय नरवाल – हरियाणा
शुभम द्विवेदी – उत्तर प्रदेश
दिलीप देसले – महाराष्ट्र
सुंदीप नेवपाणे – नेपाळ
उद्धवानी परदीप कुमार – युएई
अतुल श्रीकांत मोने – महाराष्ट्र
संजय लखन लेले – महाराष्ट्र
सय्यद हुसेन शाह – अनंतनाग (जम्मू-काश्मीर)
हिम्मत भाई कलाथाई – गुजरात
प्रशांत कुमार बालेश्वर
मनिष राजन
रामचंद्रम
शालिंदर कल्पिया
शिवय मोग्गा – कर्नाटक
जखमींची नावे (Pahalgam Terrorist Attack)
विनी भाई – गुजरात
माणिक पाटील – महाराष्ट्र
रिनो पांड्ये
एस. भालचंद्रू – महाराष्ट्र
डॉ. परमेश्वरम- चेन्नई, तामिळनाडू
अभिजवम राव – कर्नाटक
शंतरु एजे – तामिळनाडू
शशी कुमारी – ओडिसा
भालचंद्र- तामिळनाडू
शोभित पटेल – मुंबई
हेही पहा-
Join Our WhatsApp Community