उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Mandir) मार्गावरील मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात कोणतेही मांस दुकान चालवले जाणार नाही. अयोध्येचे महापौर गिरीश पती त्रिपाठी म्हणाले की, लवकरच दारू बंदी घालण्याची योजना आखली जात आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्यानंतर शिकवल्या जाणाऱ्या खोट्या इतिहासाचा बुरखा टराटरा फाडणारा चित्रपट ‘His Story of itihas’)
अयोध्येत राम पथ, १४ कोसी परिक्रमा मार्ग आणि पंचकोसी मार्गावरील मांस दुकाने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी एकूण २२ मांस दुकाने सुरू आहेत. ७ दिवसांत दुकाने हटवण्याची नोटीस संचालकांना पाठवण्यात आली आहे. असे न केल्यास कारवाई करण्याचे कडक निर्देश आहेत. अन्न आणि खत आयुक्त माणिक चंद म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात मांस दुकानांबाबत तक्रार करण्यात आली होती. यानंतर पथकाने दुकानांची तपासणी केली. येथील धार्मिक मार्गांवर २२ मांस दुकाने आढळली, जी आता हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Shri Ram Mandir)
Join Our WhatsApp Community