खलिस्तानींनी AAP ला दिले 133 कोटी; केजरीवाल यांनी दहशतवादी भुल्लरची सुटका करण्याचे दिलेले आश्वासन; दहशतवादी Gurpatwant Singh Pannu चा आरोप

पन्नूने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर त्यांच्या अटकेनंतर हे आरोप केले आहेत.

427

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने आम आदमी पार्टी (AAP) आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर खलिस्तानवाद्यांकडून शेकडो कोटींच्या देणग्या घेतल्याचा आरोप केला आहे. दहशतवादी पन्नूने दावा केला आहे की, केजरीवाल यांनी खलिस्तानी लोकांशी झालेल्या बैठकीत दहशतवादी भुल्लरला सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्याबदल्यात १३३ कोटी घेतले. पन्नूने एका व्हिडिओद्वारे हे आरोप केले आहेत.

केजरीवालांना अटक केल्यानंतर केले आरोप 

शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख पन्नू याने मुख्यमंत्री केजरीवाल, आम आदमी पार्टी (AAP) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केले. अडीच मिनिटांचा व्हिडिओ जारी त्याने केला आहे. यामध्ये पन्नूने (Gurpatwant Singh Pannu) मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नुकत्याच झालेल्या अटकेनंतर अनेक आरोप केले आहेत. पन्नूने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल स्वत:ला प्रामाणिक हिंदू म्हणवतात पण ते अप्रामाणिक हिंदू आहेत. 2014 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती, तेव्हा ते अमेरिकेत आले आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील खलिस्तानींना वचन दिले की, त्यांचे सरकार स्थापन झाल्यास, प्रोफेसर देविंदर पाल सिंग भुल्लर यांना 5 तासांच्या आत सोडले जाईल. पन्नूने (Gurpatwant Singh Pannu)  केजरीवालांवर आश्वासन मोडल्याचा आरोप केला. भुल्लरची सुटका झाली नसून पंजाबमधील भगवंत मान यांचे सरकार खलिस्तानीबद्दल बोलणाऱ्यांना रोखत असल्याचे पन्नू म्हणाला.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय ऐश्वर्याचाही सहभाग)

मुख्यमंत्री मान यांच्यावरही आरोप 

यानंतर पन्नूने भगवंत मान आणि केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीसाठी (AAP) खलिस्तानवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप केला. “2014-2022 दरम्यान, खलिस्तानींनी AAP सरकार स्थापन करण्यासाठी 133 कोटी घेतले, असे पन्नू म्हणाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबमध्ये खलिस्तानींच्या विरोधात खोट्या पोलिस चकमकी करत आहेत. पन्नू (Gurpatwant Singh Pannu) ज्या देविंदर पाल सिंह भुल्लरबद्दल बोलत आहेत, त्याने 1993 मध्ये दिल्लीत कारमध्ये बॉम्ब पेरून स्फोट घडवून आणला होता. भुल्लरच्या दहशतवादी कृत्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. युवक काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भुल्लरने हा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एम.एस.बिट्टा हे जखमी झाले होते. भुल्लर सध्या तुरुंगात आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या या आरोपांवर आम आदमी पक्षाकडून (AAP) अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. या आरोपांना आम आदमी पक्षाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. उल्लेखनीय आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च 2024 रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.