3 खासदार असलेल्या 14 मित्रपक्षांना 11 मंत्रीपदे; Modi 3.0 चे जम्बो मंत्रीमंडळ

114
3 खासदार असलेल्या 14 मित्रपक्षांना 11 मंत्रीपदे; Modi 3.0 चे जम्बो मंत्रीमंडळ
3 खासदार असलेल्या 14 मित्रपक्षांना 11 मंत्रीपदे; Modi 3.0 चे जम्बो मंत्रीमंडळ

लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या NDA सरकारचा शपथविधी रविवार, ९ जून रोजी पार पडला. राष्ट्रपती भवनासमोर पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. (modi swearing ceremony) या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे आली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांनी शपथ घेतली.

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Pak : बुमराची जादूई ४ षटकं, भारताची पाकिस्तानवर पुन्हा मात )

९ जून रोजी झालेल्या या शपथविधीमध्ये 24 राज्यातील खासदारांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय देशातील जातीय आणि राजकीय समीकरणं साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मागील मंत्रीमंडळातील 21 मंत्र्यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आलेय. भाजपच्या 61 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, तर एनडीएमधील 9 मित्रपक्षाच्या 11 खासदारांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले. या मंत्रीमंडळ स्थापनेच्या वेळी NDA तील सहा मित्रपक्षांना एकही मंत्रीपद मिळाले नाही. यामध्ये महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे.

एनडीएच्या 14 मित्रपक्षाकडे 53 खासदारांची फौज आहे. त्यातील 9 पक्षांना 11 मंत्रीपदे मिळाली आहेत. ५ मित्रपक्षांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.