मुलुंड कोविड हॉस्पिटलच्या आडून १०० कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप

96
मुलुंड कोविड हॉस्पिटलच्या आडून १०० कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड कोविड हॉस्पिटलच्या आडून १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे गटातील एका नेत्याच्या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला या हॉस्पिटलचे कंत्राट देण्यात आले होते.

ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती, २०१९ पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. या कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा अट्टाहास मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

(हेही वाचा – आपचे राघव चढ्ढा यांच्यावर शनीची वक्रदृष्टी; संमती न घेता नावे घेतली)

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारनी रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली तेथे सिडको यांना तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश देण्यात आले. सिडकोनी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला १८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी १० कोटी ९४ लाख ३० हजार रुपयांचे पेमेंट ही करण्यात आले. ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ पर्यंत म्हणजे २५ महिने हे हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला दर महिन्याला ३ कोटी ५९ लाझ ७८ हजार ३८९ रुपये इतके भाडे देण्यात आले. याचा अर्थ भाड्याच्या निमित्ताने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला सुमारे ९० कोटी रुपये देण्यात आले. तसेच हॉस्पिटल बांधण्यासाठी अधिकचे १० कोटी रुपये देण्यात आले, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

‘ती’ कंपनी कोणाची?

– रिचार्डसन क्रूडास कंपनीची जमीन या हॉस्पिटलसाठी वापरण्यात आली, त्यासाठी रिचार्डसन क्रूडासने एक ही पैसा घेतलेला नाही. त्यामुळे या १०० कोटींच्या घोटाळाची चौकशी करण्याची मागणी सोमैया यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

– आश्चर्याची बाब म्हणजे ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीचा या पूर्वीचा म्हणजे २००७ ते ३१ मार्च २०२० पर्यंतचा टर्नओव्हर १०० कोटींच्या आसपासही नाही आणि अशा कंपनीला मुंबई महानगरपालिकेने ७०० कोटी रुपये गिफ्ट दिले. कोविड म्हणजे “कमाई’ हे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी व मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.