धक्कादायक! अजूनही १० हजार अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानात अडकले!

59

स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवून घेणारी अमेरिका तालिबान्यांच्या समोर अक्षरशः गलितगात्र बनली आहे. तालिबान्यांच्या दहशतीच्या समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हात टेकले आणि अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अमेरिकन नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तब्बल १० हजार अमेरिकन नागरिक हे अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याची क्षमता आमच्याकडे नाही, अशी भूमिका व्हाईट हाऊसने घेतल्यामुळे बायडेन हे अमेरिकन नागरिकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत.

अमेरिकन नागरिकांनी चर्चिल यांची आठवण करून दिली! 

अमेरिकन नागरिकांनी जो बायडेन यांना चर्चिल यांची आठवण करून दिली आहे. डन्क्रीक येथे ३ लाख ४० हजार अमेरिकन नागरिक यांना ओलीस ठेवण्यात आले होते, त्यांना अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्सन चर्चिल यांनी जहाजे पाठवून त्यांची सुखरूप सुटका केली होती, पण अफगाणिस्तानात १० हजार नागरिक अडकले आहेत. अशा वेळी संरक्षण विभागाचे सचिव लॉयड अस्टिन यांनी मात्र ‘आम्ही इतक्या मोठ्या संख्यने नागरिकांना मायदेशात आणू शकणार नाही’, असे म्हणत आहेत, अशी तुलना अमेरिकेच्या नागरिकांनी केली आहे.

(हेही वाचा : तालिबानी म्हणतायेत लोकशाही टाकाऊ, शरिया कायद्यानेच सत्ता राबवू!)

११ जून रोजी बायडेन यांनी घेतलेला ‘तो’ निर्णय!

जो बायडेन यांनी ११ जून रोजी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. खास अफगाणिस्तानसाठी स्थापन केलेल्या आकस्मित आणि संकट कार्यरत पथक (सीसीआर) यांना पत्र लिहून अमेरिकन सैन्यांनी तेथील सहभाग कमी करावा आणि मायदेशी परतण्याची तयारी करावी, असे म्हटले होते. मात्र बायडेन यांनी हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला होता, त्यावरही टीका होऊ लागली. खुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. अत्यंत चुकीचा आणि अक्षम्य निर्णय, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आधी अमेरिकन नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणल्यानंतर सैन्य मागे घेणे अपेक्षित होते. पण तसे न करता बायडेन यांनी आधीच सैन्याला मायदेशात बोलावून अफगाणिस्तानात अमेरिकन नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.