1 of 5

मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरू आहे. तसेच पुढील तीन दिवसांत ही राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे रविवारी सुमारे 35 वर्षांनंतर महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले. राज्यात साधारण 5 जूनच्या आसपास मान्सून प्रवेश करतो. पण यावेळी तो 10 दिवसांपूर्वीच धडकला आहे. यापूर्वी 20 मे 1990 रोजी मान्सून वेळेपूर्वी पोहोचला होता. (Mumbai Rain)

मुंबईत पावसामुळे 107 वर्षांचा विक्रम मोडला आहे. IMD च्या नोंदीनुसार कुलाबा वेधशाळेत 295 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यामुळे 1918 मध्ये नोंदवलेल्या 279.4 मिलीमीटर पावसाचा विक्रम मोडित निघाला आहे. मे महिन्यात नोंदवण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. (Mumbai Rain)

मुंबईच्या प्रादेशिक हवामान खात्याने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्याच्या उस्मानाबादपर्यंत मान्सून पोहोचला आहे. (Mumbai Rain)

मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा 55 वर्षांचा विक्रम मोडला आहे. मान्सून यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. पण यंदा पहिल्यांदाच मान्सूनने त्यापूर्वी मुंबईला धडक दिली आहे. (Mumbai Rain)

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले आहेत. सायन, गांधी मार्केट, वडाळा, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हे मार्ग वळवण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाड्या सकाळी पावणे दहा वाजल्यापासून भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत. (Mumbai Rain)