1 of 7

ट्रेनचा प्रवास आरामदायक तर असतोच. पण बस, ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवासापेक्षा स्वस्त असतो. (Indian Railway)

रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही विविध रंगाचे रेल्वेचे डब्बे पाहिले असतील. या रंगीत डब्ब्यांनी तुमचे लक्ष वेधले असेल. या डब्ब्यांना, कोचना असा रंग देण्यामागे काही कारण तर नक्कीच असेल? केवळ डब्बे आकर्षक दिसण्यासाठी तर असा प्रयोग करण्यात आला नसेल का? यामागचे कारण तरी काय आहे. जाणुन घेउया ... (Indian Railway)

सर्वाधिक ट्रेन मध्ये निळ्या रंगाचे कोच असतात. या कोचला ICF म्हणजेच इंटीग्रल कोच म्हणतात. याचा कारखाना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. निळ्या रंगाचे कोच हे एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनला असतात. या कोचला एअर ब्रेक असतात. हे लोखंडाने बनविण्यात येतात. जास्त वजन असल्याने या रेल्वे केवळ 70 ते 140 किमी प्रति तासाने धावतात. (Indian Railway)

लाल रंगाचा कोच हा शताब्दी आणि राजधानी या ट्रेनला असतो. रंगापेक्षा या रेल्वे कोचचा दर्जा महत्वाचा असतो. हे कोच २००० मध्ये जर्मनी मधून भारतात आणले गेले. या कोचला बनवण्याची फॅक्टरी पंजाबच्या कपूरथला आहे. हे डब्बे अॅल्युमिनियमने तयार करण्यात येतात. त्यामुळे ते वजनाने हलके असतात. त्यामुळेच या हाय स्पीड ट्रेनला हे डब्बे जोडण्यात येतात. हे डब्बे जर्मनीहून आयात करण्यात आले आहे. त्यामुळेच हे कोच 160 ते 200 किमी प्रती तासाने धावते. डिस्क ब्रेक असल्याने अचानक रेल्वे थांबविता येते. (Indian Railway)