1 of 7

पाकिस्तानसाठी हेरगिरी (YouTuber Jyoti Malhotra) केल्याच्या आरोपाखाली गेल्या ४ दिवसांत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. २४ वर्षीय नोमान इलाहीला बुधवारी पानिपत येथून, २५ वर्षीय देवेंद्र सिंग ढिल्लनला शुक्रवारी कैथल येथून आणि २२ वर्षीय अरमानला त्याच शुक्रवारी नूह येथून अटक करण्यात आली होती. यानंतर हरियाणाच्या हिसारमध्ये ३३ वर्षीय युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. (YouTuber Jyoti Malhotra)

युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था पीआयओ (पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह्ज) च्या संपर्कात होती. ज्योती आणि अरमान हे पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होते. हा तोच दानिश आहे, ज्याला भारत सरकारने १३ मे रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली देश सोडण्याचे आदेश दिले होते. (YouTuber Jyoti Malhotra)

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये ज्योती हिला पाकिस्तानमध्ये बोलवण्यात आलं. तेथे दानिश याच्यासोबत ज्योतीचे संबंध घट्ट झाले. त्यानंतर अली अहवान नावाच्या व्यक्तीने पाकिस्तानमध्ये त्यांच्या राहण्याची आणि फिरण्याची पूर्ण व्यवस्था केली. तिथे ज्योतीची भेट पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित शकीर आणि राणा शाहबाज यांच्याशी झाली. कोणताही संशय येऊ नये म्हणून, शाकीरचा नंबर ‘जात रंधावा’ म्हणून सेव्ह करण्यात आला. (YouTuber Jyoti Malhotra)

भारतात परतल्यानंतर देखील ज्योती सतत व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानला गुपित माहिती पोहचवत होती. तपास यंत्रणांना असेही आढळून आलं आहे की, ज्योतीचं इंस्टाग्राम अकाउंट अनेक संशयास्पद क्रियाकलापांशी जोडलं गेलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक महिना आधी तिने श्रीनगर आणि पहलगामला भेट दिली होती आणि त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानला गेली होती. यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं हा तर फक्त एक बहाणा आहे. ती पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची असं तिने कबूल केलं आहे. (YouTuber Jyoti Malhotra)

या कामासाठी तिला भरपूर पैसे तर मिळालेच, पण पाकिस्तान आणि चीनच्या भेटींमध्ये तिला व्हीआयपी वागणूकही मिळाली. जेव्हा जेव्हा ती पाकिस्तानला जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात असे, असेही ज्योती मल्होत्राने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. एवढंच नव्हे तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते. आपण पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये भाग घेतल्याचंही ज्योतीने कबूल केलं. (YouTuber Jyoti Malhotra)

ज्योतीच्या सांगणायानुसार, जेव्हा ती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हाही तिला व्हीआयपी वागणूक मिळाली. ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत. ती त्यांच्यासोबत हिसारमध्ये राहते, पण तिच्या खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. युट्यूबमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही ती हात लावत नाही. तिच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. ती नेहमी विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेल्समध्येच राहायची. आतापर्यंत ती तीन वेळा पाकिस्तानला, एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली आहे, असं ज्योतीने हिसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सांगितलं. (YouTuber Jyoti Malhotra)