Shatabdi Express : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान; प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक

603

ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असे बोलले जाते पण हे खरे नसून हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी लढून प्राणाचे बलिदान दिल्यामुळे ब्रिटिशांना देश सोडावा लागला हे वास्तव आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत काँग्रेसने जाणीवपूर्वक स्वातंत्र्यसैनिकांचे हे योगदान नाकारले. मात्र २०१४ साली मोदी सरकार आले आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान सुरु झाला. आता देशभरात ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान होऊ लागला आहे. त्यांचा परिचय सर्वसामान्यांना होऊ लागला आहे. आता रेल्वेच्या बोगींमध्येही (Shatabdi Express) स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावून त्यांच्या विषयी माहिती दिली जात आहे.

प्रवाशांना सहजगत्या मिळते स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती

कोलकाता येथून सुटणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमधील (Shatabdi Express) बोगीमध्ये खिडक्यांच्या बाजूला स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्या बाजूला संबंधित स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सहजगत्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती मिळत आहे. या बोगीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद, खुदीराम बोस, मादाम कामा, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्रे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. केंद्राच्या या उपक्रमामुळे प्रवाशांसोबत असलेल्या लहान मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे. याबद्दल प्रवासी रेल्वे आणि केंद्र सरकारचे आभार मानत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारने सुरु केलेल्या या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : चार राज्यांच्या निकालांमुळे लोकसभेच्या ८२ जागांवर भाजपाची मोहर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.