Yashwant Verma Case : ०३ न्यायाधीशांच्या समितीची वर्मांना हटविण्याची शिफारस; कपिल सिब्बलांनी केली पाठराखण, म्हणाले…

Yashwant Verma Case : आपल्या अधिकृत निवासस्थानाच्या स्टोअररुममध्ये जळालेल्या नोटा सापडल्याने न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) चांगलेच चर्चेत आले. याप्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) यांची बदली देखील करण्यात आली होती.

65

Yashwant Verma Case : आपल्या अधिकृत निवासस्थानाच्या स्टोअररुममध्ये जळालेल्या नोटा सापडल्याने न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) चांगलेच चर्चेत आले. याप्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) यांची बदली देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती वर्मांच्या मदतीस कपिल सिब्बल धावून आले आहेत. न्यायमूर्ती वर्मा हे आतापर्यंतच्या सर्वोत्तम न्यायाधीशांपैकी एक असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले.(Yashwant Verma Case)

(हेही वाचा Karnataka Congress Government चे मुस्लिम लांगुलचालन; मुसलमानांचे आरक्षण आणखी वाढवणार )

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या ०३ न्यायाधीशांच्या समितीने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना हटविण्याची शिफारस केली आहे. तसेच, या शिफारसीनंतर न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुध्द महाभियोगाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) यांना वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला असून पाठराखण केल्याचे समोर आले आहे.

न्यायाधीश समितीने ६४ पानांच्या अहवालात काय म्हटले?

सर्वोच्च न्यायालयाच्या ०३ सदस्यीय न्यायाधीशांच्या समितीने न्यायमूर्ती यशवंत वर्मा(Yashwant Verma Case) यांना पदावरून हटविण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविलेल्या ६४ पानांच्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. तसेच, न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये जळालेल्या नोटा सापडल्याचे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचबरोबर, आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ‘अर्ध्या जळालेल्या नोटा’ दिसल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती वर्मा किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीशिवाय इतक्या नोटा तिथे ठेवता आल्या नसत्या, हे न्यायाधीश समितीने मान्य केले आहे. तसेच, या प्रकरणात त्याने आयुष्यात पहिल्यांदाच पैशाचा इतका मोठा डोंगर पाहिला होता, असे एका साक्षीदाराने म्हटले आहे. निवासस्थानात सापडलेल्या पैशांच्या बंडलासंदर्भात न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे कुठलेही उत्तर नसल्याचेही स्पष्ट झाले. न्यायमूर्ती वर्मा(Yashwant Verma Case) यांच्या खासगी सचिवांनी या प्रकरणाबाबत कुणालाही सांगू नका, असे अग्निशमन दलांना सांगितले होते.

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल काय म्हणाले?

सिब्बल म्हणाले, मी पूर्ण जबाबदारीने म्हणू शकतो की ते (वर्मा) मी यापूर्वी युक्तिवाद केलेल्या सर्वोत्तम न्यायाधीशांपैकी एक आहेत. तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही वकिलाला विचारू शकता, या न्यायाधीशावर काहीही चुकीचे केल्याचा आरोप नाही. ते पुढे म्हणाले, सरकारकडून अशाप्रकारे न्यायमूर्तींना लक्ष्य करण्यात येत आहे, हे धक्कादायक आहे. ज्यांच्याविरुध्द कोणतेही पुरावे नाहीत. तुम्ही अशा न्यायाधीशाचे रक्षण करत आहात ज्यांच्याविरुध्द कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. त्यांचे विधान सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे.(Yashwant Verma Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.