Revenue Intelligence : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मोठी कारवाई; बिबट्याचे कातडे, हस्तिदंत…

महसूल गुप्तचर संचालनालया(Revenue Intelligence)च्या नागपूर युनिटने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे कारवाई करत दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत जप्त केले.

36

महसूल गुप्तचर संचालनालया(Revenue Intelligence)च्या नागपूर युनिटने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे कारवाई करत दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या नागपूर युनिटने उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यानंतर जप्त केलेल्या वस्तू आणि त्या व्यक्तींना वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत पुढील तपासासाठी उज्जैनच्या जिल्हा वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, जप्त वस्तूंमध्ये दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत यांचा समावेश असून बिबट्यांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या कातडी किंवा अवयवांचा व्यापार, विक्री, खरेदी किंवा ताबा ठेवणे कायद्याने प्रतिबंधित आहे. यापूर्वी देखील जानेवारी २०२५ मध्ये डीआरआय नागपूर युनिटने अकोला येथे बिबट्याची कातडी जप्त केली आणि तीन व्यक्तींना अटक केली होती.

(हेही वाचा Uttar Pradesh मध्ये रहातात २२ पाकिस्तानी महिला आणि त्यांची ९५ मुले; ५०० जण पोलिसांच्या रडारवर )

गुप्त माहितीच्या आधारे अवैध वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी डीआरआय सातत्याने प्रयत्न करत असते. वन्यजीव (संरक्षण) कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गुप्तचर संचालनालय राज्य वन विभाग आणि इतर संस्थांशी सहकार्य करते. या प्रयत्नांचा उद्देश भारतात आणि सीमेपलीकडे वन्यजीव अवयवांच्या अवैध व्यापाराचे जाळे नष्ट करणे आहे.

भारत सरकार धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करते. डीआरआय संवर्धन कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे कार्य करते. वित्त मंत्रालयाने वन्यजीव संरक्षणाच्या कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.