कर लो दुनिया मुठ्ठी में! रिलायन्स ग्रूप ’इंडिपेंडेंस’ ब्रॅंड अंतर्गत विकणार प्रोसेस्ड फूड

149

रिलायन्सची टॅगलाईन आहे कर लो दुनिया मुठ्ठी में! रिलायन्सने पाहता पाहता खरोखर जग आपल्या मुठीत घेतलं आहे. किती तरी वेगवेगळ्या क्षेत्रात रिलायन्सने आपलं नाव कोरलं आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता बाजारात रियायन्सचे मसाले, डाळी असे पदार्थ देखील पाहायला मिळतील. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही उत्पादने आणत आहे.

( हेही वाचा : सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – फडणवीस)

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “मला आमचा स्वतःचा FMCG ब्रँड इंडिपेंडन्स लॉन्च करताना आनंद होत आहे. खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन वापरातील उत्पादने तर असतीलच त्याचबरोबर उच्च दर्जा व खिशाला परवडणारे देखील असणार आहे.”

या ब्रॅंडची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. कंपनीने गुजरातमध्ये कन्ज्युमर पॅकेज केलेल्या वस्तूंचा ब्रँड ‘इंडिपेंडेंस’ ची घोषणा केली. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री याद्वारे करण्यात येणार आहे. FMCG व्यवसायासाठी गुजरातला ‘गो-टू-मार्केट’ राज्य बनवण्याची कंपनीची योजना आहे. यानंतर ती लवकरच हा ब्रँड राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार आहे.

‘हा ब्रँड रियल इंडियन प्रॉब्लेम्ससाठी योग्य इंडियन सॉल्युशन्स घेऊन येईल.” असा विश्वास देखील ईशा अंबानी यांनी व्यक्त केला. “कण कण में भारत” अशी या ब्रंडची टॅगलाईन आहे. लाहोरी जीरा, बिंदू बेव्हरेज, नमकिन्स, केव्हिनकरे अशा ब्रॅंड्सबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची बोलणी सुरु आहे. त्यांचा असा विश्वास आहे की याद्वारे त्यांच्या एफएमसीजी व्यवसाय अधिक सक्षम होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.