घरात रडत बसलेला विकास ते समृद्धीच्या मार्गाने धावणारा विकास!

142

समृद्धी महामार्ग आता तयार झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं आहे. सबका साथ सबका विकास हे तत्व २०१४ पासून मोदींनी सत्यात उतरवून दाखवलं आहे. एखादा सिद्धांत मांडणं त्यातल्या त्यात सोपं असतं परंतु तो सिद्धांत सत्यात उतरवणं अत्यंत कठीण असतं. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना झालेली विकासात्मक कामे अत्यंत महत्वाची ठरतात. परंतु उद्धव ठाकरे यांच्या फाजील राजकीय महत्वाकांक्षेमुळे फडणवीस मुख्यमंत्री न होता स्वतः ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचा विकास मातोश्री या बंगल्यात कैद झाला.

गेली अडीच वर्षे महाराष्ट्रात आलेले प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या निष्काळजीपणामुळे बाहेरच्या राज्यात जात होते. आता ते याचं बिल शिंदे-फडणवीसांवर फोडत असले तरी हे त्यांचं पाप आहे. “समृद्धी महामार्ग मी केला, मी केला, असं कुणीही म्हणू नये. हा महामार्ग जनतेच्या सहकार्यामुळे तयार झाला आहे. हा करदात्यांच्या पैशाने तयार झालेला रस्ता आहे” अशाप्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कै. बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व कुठे नि उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व कुठे. हिंदू धर्मावर स्वतःच्या संस्कृतीनुसार गलिच्च्छ टीका करणार्‍या सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या झाल्या आहेत. लोकांनी टीका केली तेव्हा अंधारे बाईंनी माफी मागितली. परंतु अशा स्त्रीला आपल्या पक्षात घेताना उद्धव ठाकरेंना बाळासाहेब आठवले नसतील का हाच एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणूनच या दोन व्यक्तिमत्वांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब हे हिंदूतेजसूर्य होते तर उद्धव ठाकरे ते हिंदूद्वेष्ट्यांना जवळ करणारे आहेत.

( हेही वाचा: Maharashtra- Karnatka Border Dispute: अजित पवार संतापले म्हणाले, ‘बोम्मईंचे ते वक्तव्य’… )

इतकंच काय विकासाच्यानावाने देखील ह्यांची बोंब आहे. ह्यांचा विकास म्हणजे बारमालकांकडून १०० कोटींची वसुली. ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्ट सीएमचा सर्व्हे सारखा सारखा व्हायचा. आता हे सर्व्हेवाले कुठे गेले? आता का सर्व्हे होत नाही. ठाकरे बेस्ट सीएम करण्यासाठी महाराष्ट्राची वाट लागली तरी चालणार आहे का? उद्धव ठाकरे हे जगातले पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी घरात बसून कारभार(?) केला. मुळात कारभार केलाच नाही. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र खूप मागे गेला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदेांनी उठाव करुन महाराष्ट्राला बिहार होण्यापासून वाचवलं.

आता समृद्धी महामार्ग खुला झाला आहे. घरात बसून रडत बसलेला विकास आता मागे राहिला आहे आणि आता विकास समृद्धी महामार्गावरुन धावत आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव करुन महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार केले आहेत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं विकासाचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. यापुढे ह्या सरकारकडून अशा विकासात्मक कामांची अपेक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.