युगांडातून आलेला जीका व्हायरस आहे तरी काय?

154

कोरोनाच्या प्रहारानंतर आता नव्या व्हायरसने भारतात शिरकाव केला आहे. जीका व्हायरस असे या व्हायरसचे नाव असून हा चीनमधून नव्हे तर युगांडातून आला आहे. कर्नाटकातील रायचूर येथे ५ वर्षांच्या मुलीला या व्हायरसने विळखा घातला आहे. कर्नाटकातील ५ वर्षांची चिमुरडी ही या व्हायरसची पहिली शिकार आहे.

ही बातमी हळूहळू पसरु लागली आणि कोरोनाने होरपळून निघालेले लोक पुन्हा घाबरले आहेत. हा व्हायरस कोरोनासारखा पसरु शकतो अशी भीती निर्माण झाली. खरं पाहता हा व्हायरस आता सरकारसाठी आव्हान बनलेला आहे. मात्र घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. कारण हा व्हायरस नवीन असला तरी कोणतीही विपरित घटना घडलेली नाही. ज्या मुलीला लागण झाली होती, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती सुरक्षित आहे.

काय आहे जीका व्हायरस?

एका संशोधनानुसार, जीका व्हायरसची लागण झालेल्या ८०% रुग्णांना आपण व्हायरसच्या विळख्यात सापडले आहोत हे देखील माहित नव्हते. कारण या विषाणूची लक्षणे अत्यंत सामान्य आहेत. सर्दी आणि ताप अशी सामान्य लक्षणे दिसून येतात.

महत्वाची लक्षणे

वर नमूद केल्यानुसार जीका व्हायरसची लक्षणे खूप सामान्य आहेत. ताप, अंगावर लाल पुरळ येणे, स्नायू व सांधे दुखणे इ. जीका व्हायरसची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

१९४७ चा व्हायरस

हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडात आढळून आला. मात्र तेव्हापासून हा व्हायरस माकडांमध्ये आढळला आणि हळूहळू माणसांमध्ये पसरत गेला. १९५२ मध्ये पहिल्यांदा माणसामध्ये या व्हायरसने प्रवेश केला. त्यानंतर विविध देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा व्हायरस एडिज डास चावल्यावर पसरतो. डेंग्यू, चिकनगुनिया, येलो फीवर पसरवणारे डास हा व्हायरस पसरवतात.

( हेही वाचा: एलाॅन मस्क यांचा बहुमान गेला; आता ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती )

जीका व्हायरसविरोधात कसा लढा द्याल?

जीका व्हायरसचे निदान ब्लड टेस्ट किंवा यूरीन टेस्टद्वारे केले जाऊ शकते. परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस सापडलेली नाही. जीका व्हायरस डासांच्या माध्यमातून पसरतो, त्यामुळे डासांपासून स्वतःचा बचाव करणे हा या व्हायरसविरोधात सर्वात मोठा लढा ठरणार आहे. डास चावू नये म्हणून सुरक्षित कपडे घाला. तसेच पुष्कळ डास असतील अशा ठिकाणी जाऊ नका, स्वच्छता पाळा. झोपताना डासांपासून वाचण्यासाठी लोशन लावा किंवा डासांना मारण्याचे लिक्विड वापरा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.