Yes bank Share History : येस बँकेच शेअर आठवडाभरात ४.४१ टक्क्यांनी का चढला?

Yes bank Share History : जपानी कंपनी येस बँकेत २० टक्के हिस्सेदारी घेणार आहे.

83
Yes bank Share History : येस बँकेच शेअर आठवडाभरात ४.४१ टक्क्यांनी का चढला?
  • ऋजुता लुकतुके

येस बँकेच्या शेअरमध्ये या आठवड्यात गुरुवारी अचानक हलचल निर्माण झाली. आधी स्टेट बँक या सरकारी बँकेनं कंपनीतील ४० टक्के हिस्सेदारी घेतली होती. ही चाल या बँकेला बाचवण्यासाठी होती. त्यानंतर आता एसएमबीसी या जपानी वित्तीय संस्थेनं स्टेट बँकेकडून त्यांच्या गुंतवणुकीतील २० टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या बातमीनंतर येस बँकेच्या शेअरने आपली मरगळ अचानक झटकली आहे. या व्यवहारामुळे बँकेला दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार मिळणार असून, त्यांच्याकडे भक्कम बॅलन्स शीट आणि बँकेच्या वाढीसाठी भांडवली क्षमतेचा आधार असल्याचे मूडीजने नमूद केले आहे. (Yes bank Share History)

एसएमबीस भारतातील येस बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य सात खाजगी बँका – एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फेडरल बँक आणि बंधन बँक – यांच्याकडून २०% हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या बँकांनी मार्च २०२० मध्ये YES बँकेच्या पुनर्रचना टप्प्यात गुंतवणूक केली होती. एसएमबीसी २१.५० प्रति शेअर दराने १३,४८२ कोटीं रुपयांना ही हिस्सेदारी खरेदी करेल. बुधवारी ट्रेडिंग सत्रात येस बँकेचे शेअर्स २.६५% नी वाढून ₹२१.५२ वर पोहोचले, आणि बँकेचे एकूण बाजार भांडवल सुमारे ६८,००० कोटींवर पोहोचले. हिस्सेदारी खरेदीच्या घोषणेनंतर शेवटच्या पाच सत्रांत येस बँकेच्या शेअर्समध्ये २१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. (Yes bank Share History)

(हेही वाचा – KL Rahul to be Captain? भारतीय कर्णधारपदासाठी आता के. एल. राहुलही शर्यतीत)

New Project 2025 05 17T194919.398

अलीकडेच मनीकंट्रोल या वेबसाईटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, येस बँकेने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी शोधण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने जागतिक हेडहंटिंग कंपनी एगॉन झेंडर यांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे, काही ब्रोकरेज फर्म्सचा येस बँकेबाबत दृष्टिकोन अजूनही फारसा सकारात्मक नाही, कारण त्यांच्या मते, हिस्सेदारी खरेदी झाली तरी बँकेची मूलभूत स्थिती फारशी बदललेली नाही. ते म्हणतात, हा व्यवहार भावनिकदृष्ट्या सकारात्मक असला तरी मूलभूत बदल स्पष्ट नाही. (Yes bank Share History)

कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने आपल्या एका ताज्या टिपणामध्ये म्हटले की, YES बँकेच्या बिझनेस मॉडेलमध्ये काय बदल होणार आहेत यावर अजूनही स्पष्टता नाही. भागधारक कोण असणार हे स्पष्ट झाले असले, तरी बँकेच्या व्यवसायाच्या दृष्टीकोनात काही बदल झालेला नाही. “अशा उपाययोजना तेव्हाच सोप्या असतात जेव्हा समस्या एखाद्या एकाच संस्थेशी संबंधित असते आणि जेव्हा व्यापक आर्थिक परिस्थिती अनुकूल असते. मात्र, बहुतांश कर्जवाटप चक्र अनेक संस्थांना एकत्रितपणे प्रभावित करतात. लक्षात ठेवा की येस बँक अजूनही उद्योगाच्या सरासरी नफ्याच्या आणि वाढीच्या दरांपर्यंत पोहोचलेली नाही,” असे कोटकने नमूद करत शेअरवर ‘विक्री’ शिफारस दिली असून १७ चे लक्ष्य निर्धारित केलं आहे. (Yes bank Share History)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.