Willingdon Sports Club : विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबचं सदस्य शुल्क नेमकं किती आहे?

Willingdon Sports Club : ब्रिटिशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी या क्लबची स्थापना केली होती.

21
Willingdon Sports Club : विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबचं सदस्य शुल्क नेमकं किती आहे?
  • ऋजुता लुकतुके

विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब हा ब्रिटिशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनोरंजन तसंच क्रीडाविषयक छंद जोपासण्यासाठी स्थापन केलेला क्लब आहे. १९१७ साली याची स्थापना झाली. ब्रिटिश राजवटीत मुंबईचे गव्हर्नर म्हणून १९१३ ते १९१७ या कालखंडात काम पहिलेले फ्रीमन थॉमस विलिंग्डन यांच्या कारकीर्दीचा सन्मान म्हणून या क्लबला त्याचं नाव देण्यात आलं. विलिंग्डन यांनी मुंबईकरांमध्ये क्रीडाविषयक जागृती व्हावी यासाठी प्रयत्न केले. मैदानं बांधली आणि विविध स्पर्धाही सुरू केल्या. (Willingdon Sports Club)

सुरुवातीला या क्लबमध्ये फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच प्रवेश होता. दक्षिण मुंबईतील एका विस्तीर्ण जागी या क्लबची उभारणी झाली आहे. पण, स्वातंत्र्यानंतर अर्थातच, भारतीयांसाठीही हा क्लब खुला करण्यात आला. मुंबईत ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात हा क्लब उभा आहे. या क्लबचं वैशिष्ट्य म्हणजे इथं १८ होल्सचं विस्तीर्ण गोल्फ मैदान आहे. याशिवाय जलतरण, बॅडमिंटन, क्रिकेट, स्क्वॉश, टेनिस, पेडल कोर्ट, फुटबॉल टर्फ, बॉक्स क्रिकेट, बिलियर्ड्स अशा सर्वच ऑलिम्पिक खेळांची सुविधा इथं आहे. विस्तीर्ण ३० एकर जागेवर हा क्लब वसलेला आहे. क्लबची ब्रिटिश काळातील जुनी ओळख आहे ती इथल्या घोड्याच्या शर्यती आणि पोलो खेळांची. (Willingdon Sports Club)

(हेही वाचा – निवृत्ती घ्या, नवं नेतृत्व तयार करा; Ajit Pawar यांनी नक्की कोणाला दिला सल्ला ?)

लेडी विलिंगडन यांनी या क्लबच्या उभारणीत सुरुवातीपासून लक्ष घातलं होतं. भारतातील ब्रिटिश नागरिक आणि स्थानिक भारतीय यांच्यातील संबंध आणि सांस्कृतिक देवाण घेवाण वाढवण्याचं श्रेय लेडी विलिंगडन यांना दिलं जातं. त्यांनीच हा क्लब भारतीयांसाठीही खुला केला. निदान उच्चभ्रू भारतीय या क्लबमध्ये जायला लागले. तेव्हापासून इथं उन्हाळ्यात भरणाऱ्या घोड्यांच्या शर्यती आणि पोलोचे खेळ प्रसिद्ध झाले. भारतीय संस्थानिक आणि राजे दरवर्षी उन्हाळ्यात इथं यायचे आणि त्यांची क्लबमध्ये वर्दळ असायची. सामान्य लोकही त्यांचा खेळ बघण्यासाठी गर्दी करायचे. (Willingdon Sports Club)

अलीकडे या क्लबने नवीन सदस्य नोंदणी बंद केली आहे. मागची पाच वर्षं विलिंग्डन क्लबने नवीन सदस्य नोंदणी केलेली नाही. पण, शेवटची सदस्य नोंदणी झाली तेव्हा या क्लबचं वार्षिक शुल्क २.१५ लाख रुपये इतकं होतं. शिवाय क्लबने आजीवन सदस्य नोंदणीही सध्या बंद आहे. पण, कॉर्पोरेट सदस्यतेसाठी कंपनीला ७५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यात कंपनीच्या दोन सदस्यांना १० वर्षांसाठी क्लबच्या सुविधा वापरता येतील. (Willingdon Sports Club)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.