wildlife sanctuaries in madhya pradesh : चड्डी पहन के फूल खिला है; मध्य प्रदेशातील ‘या’ अभयारण्यातूनच मिळाली रुडयार्ड किपलिंग यांना ‘द जंगल बुक’ लिहिण्याची प्रेरणा

30
wildlife sanctuaries in madhya pradesh : चड्डी पहन के फूल खिला है; मध्य प्रदेशातील 'या' अभयारण्यातूनच मिळाली रुडयार्ड किपलिंग यांना 'द जंगल बुक' लिहिण्याची प्रेरणा

मध्य प्रदेशला मिळालेल्या अमूलाग्र नैसर्गिक जैविक संपत्तीचं वर्णन करू तितकं कमी आहे. इथे वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेली वीसपेक्षा जास्त अभयारण्ये आहेत. रॉयल बंगाल टायगर आणि एशियन लायनपासून ते सुसर, रानडुक्कर, ब्लू बुल, चितळ, सांबर, सिव्हेट आणि इतर अनेक प्रजाती इथल्या अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतात.

हिरवळीचे गालिचे पसरल्यासारखं इथल्या प्रत्येक अभयारण्यात काहीतरी नवीन पाहायला मिळतं, ज्याची तुलना इतर कोणत्याही ठिकाणाशी करता येणार नाही. मग ते राफ्टिंग असो, बोटिंग असो, वाघांचं निरीक्षण असो किंवा अगदी शॉर्ट हायकिंग असो किंवा नैसर्गिक ट्रेल असो, मध्य प्रदेशातली आश्चर्यकारक अभयारण्ये पाहताना खरंच डोळ्यांचे पारणे फिटते. त्यांपैकीच काही अभयारण्यांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात… (wildlife sanctuaries in madhya pradesh)

(हेही वाचा – Accident News : मुंबई- गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडीमध्ये बस उलटून तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

बागदरा वन्यजीव अभयारण्य

१९७८ साली स्थापन करण्यात आलेलं हे अभयारण्य म्हणजे कोरडं पानझडी जंगल आहे. हे अभयारण्य असंख्य प्रजातींच्या वनस्पती आणि प्राण्यांचं निवासस्थान आहे. इथलं सर्वांत प्रसिद्ध आकर्षण म्हणजे ‘गौरा टेकडी’ इथलं अत्यंत आकर्षक असं रॉक पेंटिंग होय.

याव्यतिरिक्त इथे सागवान वृक्ष, तेंदू, धावडा, खजैर, लेंडिया, लता आणि इतर फळबागाही आहेत. तसंच या अभयारण्यात वाघ, चिंकारा, पँथर, सांबर, तरस, हरण, चितळ, नीलगाय, काळवीट आणि रानडुक्कर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. (wildlife sanctuaries in madhya pradesh)

  • सफारीची वेळ : पावसाळ्याव्यतिरिक्त दररोज सकाळी ०६:०० ते संध्याकाळी ०६:०० पर्यंत
  • ठिकाण : सिद्धी जिल्हा, मध्य प्रदेश
  • भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ : ऑक्टोबर ते मार्च

(हेही वाचा – HP Service Center : एचपी सर्व्हिस सेंटरमध्ये फोन केलात तर तुम्हाला १५ मिनिटे वाट का बघावी लागते?)

बोरी वन्यजीव अभयारण्य

बोरी वन्यजीव अभयारण्य हे सातपुरा राष्ट्रीय उद्यान आणि पचमढी अभयारण्यासोबतच पचमढी बायोस्फीअर रिझर्व्ह बनवते. या अभयारण्याचं आकर्षक सौंदर्य देशभरातल्या निसर्ग प्रेमी आणि ट्रेकिंगसाठी उत्साही असलेल्या लोकांना आकर्षित करतं.

या अभयारण्यात सागवान, तेंदू आणि धोरा ही झाडं पाहायला मिळतात.
तसंच इथे बिबट्या, वाघ, सांबर, चितळ, नीलगाय, रीसस मकाक, गौर आणि तरस यांसारखे बप्राणी पाहायला मिळतात.

  • ठिकाण : रतीबंदर, मध्य प्रदेश ४६१८८१
  • भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ : नोव्हेंबर ते एप्रिल
पेंच वन्यजीव अभयारण्य

पेंच अभयारण्याचं क्षेत्रफळ हे दोन राज्यांमध्ये पसरण्याइतकं विस्तृत आहे. मध्य प्रदेशातलं हे सर्वोत्तम वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्यामुळेच रुडयार्ड किपलिंग यांना आपल्या ‘द जंगल बुक’ साठी प्रेरणा मिळाली.

या अभयारण्यात ३०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. जसं की, सागवान, बेल, साजा, लेंडिया, साल, महुआ, कडुनिंब, बांबू, बिजा, पळस अशी अनेक झाडं इथे आहेत. तसंच या अभयारण्यात वाघ, सांबर, चितळ, नीलगाय, वन्य डुक्कर, बिबट्या, पँथर, तरस, कोल्हा, चिंकारा, सिव्हेट आणि लंगूर यांसारखे वन्यजीव पाहायला मिळतात. (wildlife sanctuaries in madhya pradesh)

(हेही वाचा – Batsman Using Phone : इंग्लिश काऊंटी स्पर्धेत फलंदाजाच्या खिशातून मोबाईल फोन पडल्यामुळे खळबळ)

सफारीची वेळ :
  • उन्हाळ्यात सकाळी ०६:३० ते ९:३० वाजेपर्यंत, तर संध्याकाळी ४:०० ते ०६:३० वाजेपर्यंत
  • हिवाळ्यात सकाळी ०७:३० ते १०:३० वाजेपर्यंत तर दुपारी ०३:०० ते संध्याकाळी ०५:३० वाजेपर्यंत
  • सफारीचा खर्च : प्रति वाहन १,५०० रुपये
  • ठिकाण : सिवनी आणि छिंदवाडा जिल्हा, मध्य प्रदेश
भेट देण्याचीसर्वोत्तम वेळ कोणती?
  • फेब्रुवारी ते एप्रिल
सिंघोरी वन्यजीव अभयारण्य

हे मध्य प्रदेशातल्या सर्वात आश्चर्यकारक वन्यजीव अभयारण्यांपैकी आणि वन्यजीवांच्या विस्तृत श्रेणी असलेलं अभयारण्य एक आहे. या अभयारण्याच्या परिसरात शिव मंदिर, चौकीगड किल्ला, जामगड गुहा आणि भंडारिया मंदिर अशी काही ठिकाणं आहेत.

सिंघोरी अभयारण्यात सागवान, बांबू, खुर्ची, बाजा, दौरा, तेंदू आणि सलई यांसारखी झाड आढळतात. हे उष्णकटिबंधीय पानझडी जंगल आहे. तर इथे रॉयल बंगाल टायगर, सांबर, बिबट्या, चितळ, नीलगाय, वन्य डुक्कर, कोल्हा हे प्राणी पाहायला मिळतात. (wildlife sanctuaries in madhya pradesh)

  • ठिकाण : बारी तहसील, रायसेन जिल्हा, मध्य प्रदेश
  • भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ : ऑक्टोबर ते मार्च

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis दिल्ली दौऱ्यावर; नेमकं काय कारण? वाचा)

रतापाणी वन्यजीव अभयारण्य

हे अभयारण्य इथल्या सुंदर सागवान वृक्षांसाठी आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ भिमबेटका रॉक लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. रतापाणी हे मध्य प्रदेशातल्या सर्वात रोमांचक वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. २०१३ साली एनटीसीएने रतापाणीचा दर्जा ‘व्याघ्र अभयारण्या’मध्ये श्रेणीसुधारित केला होता. एक महत्त्वाचं नैसर्गिक अभयारण्य असण्याव्यतिरिक्त इथल्या जंगलांमध्ये आतील भागात असलेल्या रॉक लेण्यांमुळे या ठिकाणाला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.

या अभयारण्यात सागवान आणि बांबूची झाडं पाहायला मिळतात. तर इथे वाघ, ढोले, कोल्हा, बिबट्या, गर्बिल, पोर्क्युपिन, चितळ, नीलगाय, सांबर, भारतीय लंगूर, चार शिंगे असलेला काळवीट, रीसस मकाक, रानडुक्कर, कोब्रा, अजगर, साप, क्रेट, बी इटर, कोकिळ पक्षी, किंगफिशर, बंगाल गिधाड, जंगली कावळा, पॅराकीट, बटेर, काळा ड्रोंगो, फ्लायकॅचर आणि यांसारखे बरेच प्राणी तसंच पक्षी आढळतात. (wildlife sanctuaries in madhya pradesh)

  • ठिकाण : रतापाणी, मध्य प्रदेश ४६४९९०
  • भेट देण्याची सर्वोत्तम वेळ : नोव्हेंबर ते एप्रिल

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.