
-
ऋजुता लुकतुके
पर्यावरणपूरक ऊर्जेच्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलेली वारी रिन्युएबल्स ही कंपनी शेअर बाजारात सध्या उसळी घेताना दिसत आहे. तिमाही निकालांचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. आणि कंपनीचा तिमाही निकाल याच आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यानंतर ए्कट्या गुरुवारी (१७ एप्रिल) कंपनीचा शेअर १४ टक्क्यांनी वर आला. कारण, कंपनीचा तिमाही निकाल आधीच्या वर्षाच्या तुलनेत चांगला आहे. कंपनीचा तिमाही नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत ८४ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा नफा ९३.७४ कोटी रुपये इतका नोंदवला गेला.. कंपनीचा उत्पादनातून येणारा महसूल मात्र ११ टक्क्यांनी वाढून ३६० कोटींवर पोहोचला आहे. (Waaree Renewables Share Price)
या कामगिरीच्या आधाराने शेअर गुरुवारी ८३ अंशांनी वाढून १,१०७ रुपयांवर बंद झाला आहे. शुक्रवारी शेअर बाजाराला गुड फ्रायडेची (Good Friday) सुटी आहे. या एका आठवड्यात शेअरमध्ये तब्बल २७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
(हेही वाचा – Mumbai-Thane महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युती होणार!)
वारी रिन्युएबल्स ही कंपनी सौरऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. वैयक्तिक आणि संस्था तसंच कंपन्यांना मोकळ्या जागेत गरजेनुसार, सौरऊर्जा पॅनल (Solar Panel) बसवून देण्याचं काम ही कंपनी करते. खरंतर २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात आला होता. नवीन बिझिनेस मॉडेल असलेल्या या कंपनीला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि १४२७ ते १,५०३ प्राईस बँड असलेला शेअर पहिल्याच दिवशी १० टक्क्यांनी वर पोहोचला होता. त्यानंतर महिनाभरातच कंपनीने ३,०३७ रुपयांचा भावही गाठला. कंपनीकडे तेव्हा नवनवीन ऑर्डर होत्या. आणि सौरऊर्जा क्षेत्रातील मक्तेदारी कंपनीकडे होती. (Waaree Renewables Share Price)
(हेही वाचा – शिवसेना उबाठा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून दूर; Sanjay Nirupam यांचा आरोप)
सुरुवातीच्या प्रतिसादानंतर मात्र मूल्यांकन वाढल्यावर शेअरमध्ये नफारुपी विक्रीचा जोर सुरू झाला. त्यातच यावर्षी ७ जानेवारीला कंपनीचे सीएफओ दिलीप पंजवानी (Dilip Panjwani) यांनी कंपनीतून तडकाफडकी राजीनामा दिला. आणि त्यानंतर शेअरमध्ये घसरण सुरू झाली. यंदा जानेवारी महिन्यापासून सुरू झालेला विक्रीचा जोर आता मात्र थांबलेला दिसत आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत शेअरमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. आनंद राठी (Anand Rathi) या संशोधन संस्थेनं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर चांगला असल्याचं म्हटलंय. तर जेफरीजनेही २०२७ पासून हा शेअर खरी वाढ दाखवू शकेल, असं संशोधन अहवालात म्हटलं आहे. (Waaree Renewables Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरविषयी कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community