Vishal Mega Mart Share Price : तिमाही निकाल आणि ईएसओफी शेअरमुळे गाजतोय विशाल मेगा मार्टचा शेअर

Vishal Mega Mart Share Price : निकालांनंतर शेअरवर १० टक्के अपर सर्किट लागलं होतं.

20
Vishal Mega Mart Share Price : तिमाही निकाल आणि ईएसओफी शेअरमुळे गाजतोय विशाल मेगा मार्टचा शेअर
  • ऋजुता लुकतुके

विशाल मेगा मार्टचा शेअर सध्या चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत कर भरल्यानंतरचा नफा तब्बल ८८ टक्क्यांनी वाढल्याचं यातून समोर आलं आहे. त्यामुळे लागलीच शेअरला १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. शेअरची किंमत थेट ११८ रुपयांवर जाऊन पोहोचली. (Vishal Mega Mart Share Price)

गेल्यावर्षी याच तिमाहीत कर भरल्यानंतरचा नफा ६१.२ कोटी रुपये इतका होता. ते प्रमाण आता ११५ कोटींवर गेलं आहे. या बातमीनंतर शेअरमध्ये सकारात्मक वातावरण असून महिनाभरात शेअर १५ टक्क्यांनी वर गेला आहे. तर शुक्रवारी बाजार बंद होताना शेअर १.४१ अंशांच्या वाढीसह १२०.६० वर पोहोचला आहे. (Vishal Mega Mart Share Price)

(हेही वाचा – Rohit Sharmaच्या निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपदी कुणाची वर्णी?, २० जूनपासून इंग्लंडसोबत कसोटी मालिका)

New Project 2025 05 10T204848.885

कंपनीच्या महसूलातही २३ टक्क्यांची वाढ होऊन तो २,५४७ वर पोहोचला आहे. विशाल मेगा मार्टने आपल्या दुकानांची संख्या आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८८ नी वाढवली आहे. यातील २८ दुकानं ही शेवटच्या तिमाहीत उभी राहिली. याचाच परिणाम कंपनीच्या कामगिरीवर दिसून येतोय. या निकालामुळे खुश होऊन कंपनीने आनंद कर्मचाऱ्यांबरोबर वाटण्याचं ठरवलं आहे. (Vishal Mega Mart Share Price)

नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार, कंपनी ईएसओपी योजनेअंतर्गत २.७१ कोटी रुपयांचे शेअर आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या स्वरुपात देऊ करणार आहे. या शेअरचं दर्शनी मूल्य १० रुपये प्रती शेअर इतकं आहे. कंपनीचं भाग भांडवलही त्यामुळे तब्बल ४५ अब्जांनी वाढणार आहे. (Vishal Mega Mart Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.