Vijay Mallya Net Worth : आयपीएल विजेत्या आरसीबीचे मालक विजय माल्या यांची एकूण संपत्ती किती आहे?

किंगफिशर एअरलाईन्स बंद झाल्यावर माल्यांवर कर्जही झालं.

48
Vijay Mallya Net Worth : आयपीएल विजेत्या आरसीबीचे मालक विजय माल्या यांची एकूण संपत्ती किती आहे?
Vijay Mallya Net Worth : आयपीएल विजेत्या आरसीबीचे मालक विजय माल्या यांची एकूण संपत्ती किती आहे?
  • ऋजुता लुकतुके

किंगफिशर एअरलाईन्सचे (Kingfisher Airlines) मालक विजय माल्या (Vijay Mallya) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांचा आयपीएल (IPL) संघ रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरूने (RCB) आयपीएल जिंकल्यामुळे. आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक घोषणा केली की, त्यांना आपली बाजू नीट मांडण्याची संधी मिळाली तर ते कर्ज बुडवल्या प्रकरणी खटला चालवण्यासाठी स्वत: भारतात येतील. त्यांच्या कंपनीवर एकूण ६,०२३ कोटी रुपयांचं कर्ज असताना ते भारतातून पळून गेले. ते स्वत: निर्दोष आहेत असं त्यांचं सुरुवातीपासून सांगणं होतं. (Vijay Mallya Net Worth)

खरंतर २८ व्या वर्षी युनायटेड ब्रुअरीज या मद्यउत्पादक कंपनीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लहान वयात उद्योजकता दाखवून दिली होती. घरचा उद्योग त्यांनी एअरलाईन्स, रियल इस्टेट कंपनी आणि शीतपेय बनवणाऱ्या कंपनीपर्यंत वाढवला. पण, यात किंगफिशर एअरलाईन्स (Kingfisher Airlines) चालवताना त्यांची दमछाक झाली. त्यांच्यावरील कर्ज वाढत गेलं. कंपनी तर बंद झालीच. बाकीचे उद्योगही त्यांना विकावे लागले. शिवाय कर्ज बुडवेगिरीचा आरोप झाला. आणि कोर्टात खटले दाखल झाले. आणि खटल्यापासून लांब पळत त्यांनी देशच सोडला. (Vijay Mallya Net Worth)

(हेही वाचा – Hospital : वैद्यकीय व्यवसाय ज्वालामुखीच्या तोंडावर?)

एकेकाळी म्हणजे २०१३ मध्ये त्यांची वैयक्तिक मालमत्ता ही ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. ‘किंग ऑफ गुड टाईम्स,’ असं त्यांना म्हटलं जायचं. २०२२ मध्ये त्यांची मालमत्ता १.०२ अब्ज अमेरिकन पोहोचल्याचं एका लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समजतं. त्यांची जगभरात भारतासह अमेरिका, लंडन आणि फ्रान्समध्ये मालमत्ता आहे. अमेरिकेत ट्रंप प्लाझामध्ये त्यांच्या नावावर एक पेंटहाऊस आहे. २०१० मध्ये त्याची किंमत २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. याच प्लाझामध्ये ट्रंप यांच्या मालकीची आणखी तीन घरं किंवा मालमत्ता आहेत. तर फ्रान्समध्ये कॅन्स जवळच्या एका बेटावर त्यांचं आलीशान घर आहे. (Vijay Mallya Net Worth)

२०१२ मध्ये किंगफिशर एअरलाईन्स (Kingfisher Airlines) दिवाळखोरीत निघाल्यावर माल्या यांच्यावर बँकांचे पैसे बुडवल्याचा आरोप झाला. म्हणता म्हणता मूळ कर्ज वाढत जाऊन ९,००० कोटींवर पोहोचलं. या प्रकरणात माल्या भारतीय न्यायालयात दोषी आढळले आहेत. पण, हा निकाल लागण्यापूर्वी २०१६ मध्ये ते ६९ व्या वर्षी लंडनला पळून गेले. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर त्यांच्या मालकीची ४० दशलक्ष अमेरिकन डॉलरची रक्कम चुकीच्या पद्धतीने मुलांच्या नावांवर वळवल्याचा गुन्हाही भारतीय न्यायालयात सिद्ध झाला आहे. आणि या प्रकरणात माल्या यांना ४ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. भारताने युनायटेड किंग्डम सरकारकडे माल्यांच्या प्रत्यार्पणासाठी खटला दाखल केला आहे. (Vijay Mallya Net Worth)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.