Vedanta Share Price : मजबूत तिमाही निकाल आणि बोनस शेअरच्या घोषणेनंतर बाजारात चमकतोय हा शेअर

142
Vedanta Share Price : मजबूत तिमाही निकाल आणि बोनस शेअरच्या घोषणेनंतर बाजारात चमकतोय हा शेअर
Vedanta Share Price : मजबूत तिमाही निकाल आणि बोनस शेअरच्या घोषणेनंतर बाजारात चमकतोय हा शेअर
  • ऋजुता लुकतुके

वेदांता ही धातू उत्पादन क्षेत्रातील भारताची आघाडीची कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने चांगला नफा नोंदवला आहे. ॲल्युमिनिअम (Aluminium) आणि जस्त उद्योगाने कंपनीला चांगली साथ दिली. त्यामुळे कंपनीने या तिमाहीत आपला नफा तब्बल १०७ टक्क्यांनी वाढवला. निव्वळ नफा आता ३,२८७ कोटी रुपयांवर गेला आहे. फक्त इतकंच नाही तर कंपनीकडे विस्तारासाठी हातात रोकड आहे, हे देखील निकालातून स्पष्ट होत आहे. (Vedanta Share Price)

कंपनीने धातू उत्पादन, खाणकाम क्षमतेच्या विस्ताराबरोबरच वीज निर्मिती क्षेत्राचाही विस्तार सुरू केला आहे. आणि वीज निर्मितीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून ती वेदांतामधून वेगळी काढण्याचा कंपनीचा विचार आहे. या सगळ्यासाठी हातात असलेला पैसा कंपनीला वापरता येणार आहे. या सकारात्मक बातमीनंतर शेअर बाजारात (Stock market) वेदांता कंपनीची चलती सुरू झाली आहे. निकाल ३० एप्रिलला लागल्यावर शेअर काही मिनिटांतच ६ टक्क्यांनी वर गेला. मागच्या आठवड्यात शेअरमध्ये नफारुपी विक्री दिसली. शेअर ५ दिवसांत जवळ जवळ २ टक्क्यांनी म्हणजे ८.१५ अंशांनी घसरला. पण, एकूणच सकारात्मक वातावरणामुळे शेअर महिनाभरात ७.३३ टक्क्यांनी वर चढला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ०.९० अंशांच्या मामुली वाढीसह बंद झाला. (Vedanta Share Price)

(हेही वाचा – India Pakistan War : राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला ; भारतीय हवाई दलाने पाकचे मनसुबे उधळले)

WhatsApp Image 2025 05 10 at 10.16.43 AM

या तिमाही निकालानंतर संशोधन संस्थांनीही या शेअरच्या निर्धारित लक्ष्यामध्ये सुधारणा केली आहे. शिवाय कंपनी आपली क्षमता वाढवणार असल्यामुळे पुढील तिमाहीत कामगिरी आणखी सुधारलेली असेल असा होरा आहे. एमओएफएसएल या संस्थेनं वेदांता शेअरला न्यूट्रल रेटिंग दिलं आहे. तर एका वर्षात शेअरचं लक्ष्य ४७० रुपये निर्धारित केलं आहे. एमके ग्लोबल या संशोधन संस्थेनं खरेदी करण्याचा सल्ला दिला असला तरी निर्धारित लक्ष्य ५ टक्क्यांनी कमी करून आधीच्या ५५० रुपयांवरून ५२० रुपये केलं आहे. (Vedanta Share Price)

नुवामा संस्थेला मात्र कंपनीच्या ॲल्युमिनिअम (Aluminium) उत्पादनातून चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे. ही गोष्ट अधोरेखित करताना त्यांनी शेअरचं लक्ष्यही ६२३ रुपये निर्धारित केलं आहे. तर सीएसएलएनं वेदांतासाठी ५३५ इतकं लक्ष्य निर्धारित केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.