-
ऋजुता लुकतुके
हिंदू संस्कृतीतील पुराण, वेद आणि उपनिषदांचं वाचन केलेल्या लोकांसाठी ‘वेदांत’ या शब्दाचा अर्थ तसा नवीन नाही. माणसातील स्वत्त्व आणि मुक्तीच्या मार्गाचा शोध किंवा तत्त्वज्ञान म्हणजे वेदांत. पण, हा अध्यात्मिक अर्थ झाला. वेदांचा अभ्यास असलेले एक डॉक्टर शिशिर जयसवाल यांना वेदांताचा भौतिक अर्थ शोधायचा होता. तसं त्यांनी आपल्या चरित्रात म्हटलंच आहे. त्या शोधात असताना त्यांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाचाही उपयोग करायचा होता. एमबीबीएस, एमडी आणि एमसीएच ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांना रुग्णसेवा पण, ज्यांना ती सहज मिळत नाही, अशांसाठी सुरू करायची होती. (Vedanta Hospital)
त्या हेतूने त्यांनी उत्तर प्रदेशात आधुनिक पद्धतीचे उपचार जिथे फारसे उपलब्ध नव्हते अशा ठिकाणी वेदांत याच नावाने रुग्णालय सुरू करायचं ठरवलं. डॉ. जयसवाल यांच्यासाठी वेदांत या शब्दाचा अर्थ ‘मनुष्य असण्याची गुणवत्ता,’ असा होता. म्हणजेच ते वेदांताचा अर्थ माणुसकीशी जोडत होते. त्या विचारांनीच त्यांनी योग शास्त्राची ध्यान, ज्ञान, समर्पण आणि सेवा ही तत्त्व एक करून आझमगड इथं पहिल्या वेदांत रुग्णालयाची स्थापना केली. एकाच छताखाली रोगाचं निदान आणि उपचार होतील असं त्यांना पाहायचं होतं. (Vedanta Hospital)
(हेही वाचा – Realme GT 7t : रियलमी जीटी ७ मालिकेवर ६,००० रुपयांपर्यंतची सूट कशी मिळवाल?)
डॉ. शिशिर यांनी त्यांचे वडील लहान वयातच गमावले. कारण, आझमगडहून जवळचं मोठं रुग्णालय किमान ९० किलोमीटरवर होतं. लखनौ तर २७० किमी दूर होतं. त्यामुळे डॉक्टर होऊन रुग्णांची आणि खासकरून गरीब रुग्णांची सेवा करायची हे ध्येयच डॉ. जयसवाल यांनी बाळगलं होतं. त्यानुसार, वेदांत विश्वस्त निधी उभारून त्यांनी आझमगड इथंच पहिल्या रुग्णालयाची स्थापना केली. (Vedanta Hospital)
१५० खाटांचं सुसज्ज रुग्णालय २००६ मध्ये उभं राहिलं. इथं २० तज्ज डॉक्टर आहेत. २०० पेक्षा जास्त प्रशिक्षित कर्मचारी आहेत. न्युरोलॉजीपासून ते जनरल सर्जरी आणि जनरल मेडिसिनच्या सुविधाही इथं उपलब्ध आहेत. डायलिसिस आणि दंतवैद्यक उपचारही इथं होतात. गरजू लोकांना कमीत कमी पैशात आणि प्रसंगी विनामूल्य उपचार मिळावेत हा इथला दंडक आहे. डॉ. जयसवाल वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर उत्तरप्रदेशमध्येच राहिले. त्यांनी स्थानिक लोकांसाठी आपलं शिक्षण वापरण्याचं ठरवलं. त्यातून हे रुग्णालय उभं राहिलं आहे. आता आझमगडच नाही तर उत्तर प्रदेशची ओळख बनलं आहे. (Vedanta Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community