Uttan Beach : सुंदर बीच, केशव सृष्टी, डोंगरी किल्ला ट्रेकिंग आणि बरंच काही; उत्तन बीचला भेट द्या आणि करा मज्जाच मज्जा!

34
Uttan Beach : सुंदर बीच, केशव सृष्टी, डोंगरी किल्ला ट्रेकिंग आणि बरंच काही; उत्तन बीचला भेट द्या आणि करा मज्जाच मज्जा!

उत्तन हे मुंबईच्या मध्यभागी असलेलं एक बेट आहे. या बेटावर ताजी हवा, शांत वातावरण आणि समुद्राचा शांत गाज ऐकू येत असल्यामुळे हे ठिकाण आराम करण्यासाठी किंवा शांततेच्या शोधात येणाऱ्या सगळ्या पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. तसंच जर तुम्हाला नेहमीच्याच अलिबाग, लोणावळा, इगतपुरी किंवा माथेरान आशा ठिकाणी फिरायला जाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही उत्तन इथे नक्कीच भेट द्यायला हवी. (Uttan Beach)

उत्तन इथे कसं पोहोचायचं?

उत्तन हे मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. इथे तुम्ही रोड ट्रिपनेही पोहोचू शकता. याव्यतिरिक्त भाईंदर रेल्वे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनने जाऊ शकता. तिथून तुम्हाला उत्तनला जाण्यासाठी बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. उत्तन हे भाईंदर रेल्वे स्थानकापासून फक्त ८ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

(हेही वाचा – India Pak War Update : कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकचा खोट्या दाव्याचा बुरखा टराटरा फाडला; फोटो दाखवत केली पोलखोल)

उत्तन बेटावर जाऊन भेट देण्यासारख्या ठिकाणांची यादी पुढीलप्रमाणे आहे : 

उत्तन बीच

उत्तन हे समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा इथले समुद्र किनारे स्वच्छ आणि शांत आहेत. कारण या ठिकाणी मुंबईपेक्षा तुलनेने कमी लोक भेट देतात. उत्तन या गावापासून काही किलोमीटर अंतरावर वेलंकनी तीर्थ आणि उत्तन व्हर्जिन बीच यांसारखे समुद्र किनारे आहेत. (Uttan Beach)

उत्तन इथे समुद्र किनाऱ्यावर कसं पोहोचायचं?

उत्तन गावापासून समुद्र किनारा फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे. समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी स्थानिक रिक्षा उपलब्ध आहेत.

उत्तन वाशी

उत्तन वाशी हे एक लहान आणि पूर्णपणे निर्जन बेट आहे. हे बेट म्हणजे निश्चितच एक लपलेल्या खजिन्यासारखंच आहे. जर तुम्हाला या ठिकाणी जायचं असेल किंवा हे ठिकाण आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही तिथल्या स्थानिक कोळ्यांपैकी एकाशी मैत्री करून तिथे पोहोचू शकता. तसंच या बेटाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकता. स्थानिक कोळी लोक आपल्या परंपरेनुसार वर्षातून एकदा या बेटावर येऊन पूजा करतात आणि आनंद साजरा करतात.

उत्तन वाशी या समुद्र किनाऱ्यावर कसं पोहोचायचं?

गोराई बीचवरून रिक्षाने आणि नंतर स्थानिक कोळ्यांच्या साहाय्याने बोटीने उत्तन वाशी या बेटावर पोहोचता येतं. तिथे पोहोचण्यासाठी ३० ते ४५ मिनिटांचा बोटीचा प्रवास आहे. (Uttan Beach)

(हेही वाचा – Mahalaxmi Racecourse : फक्त ३०० रुपयांत पाहू शकता मुंबईत घोड्यांची शर्यत; महालक्ष्मी रेसकोर्सचा इतिहास घ्या जाणून)

डोंगरी किल्ल्यावर ट्रेकिंग

हे ठिकाण इरमित्री किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. हा किल्ला १७ व्या शतकातला एक किल्ला आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंग करता येते.

या किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला तुमच्या चौहुबाजूंनी निसर्गरम्य दृश्य दिसेल. पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला, दक्षिणेला एस्सेल वर्ल्ड पार्क आणि पूर्वेला असलेलं सुंदर बोरिवली नॅशनल पार्क तुम्ही पाहू शकता.

डोंगरी किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं?

उत्तन इथल्या म्युनिसिपल मार्केटपासून दुसऱ्या क्रमांकाच्या रस्त्याने पुढे चालत गेल्यास हे किल्ला दृष्टीस पडतो.

चिमाजी आप्पा उद्यान

चिमाजी आप्पा उद्यान हे निसर्गाशी संलग्न होणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुंदर आश्रयस्थान आहे. या उद्यानाची चांगली काळजी घेतली जाते. या उद्यानात भरपूर हिरवळ, चालण्याचे रस्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समुद्रासमोरचं सुंदर दृश्य दिसतं.

जर तुम्हाला शांत मोकळ्या जागेचा आनंद घ्यायचा असेल तर हे उद्यान तुमच्यासाठी अगदी परिपूर्ण आहे. हे उद्यान म्हणजे एक आदर्श पिकनिक स्पॉट आहे. इथे तुम्ही आरामात फेरफटका मारू शकता किंवा बेंचवर बसून शांतपणे वाचन करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथे बसून सूर्यास्ताच्या वेळी सुंदर समुद्र किनारा पाहू शकता. इतिहास प्रेमींसाठी देखील हे महत्वाचं स्मारक आहे. (Uttan Beach)

(हेही वाचा – Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !)

चिमाजी आप्पा उद्यान इथे कसं पोहोचायचं?

हे उद्यान डोंगरी किल्ल्याच्या अगदी शेजारी आहे. तुम्ही तिथल्या स्थानिकांना इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता विचारू शकता.

केशव सृष्टी

केशव सृष्टी हे पर्यावरणपूरक शिक्षण केंद्र आहे. २०० एकरच्या क्षेत्रामध्ये नुसती हिरवळ दिसून येते. इथे शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. सेंद्रिय शेती, निसर्ग मार्ग आणि नैसर्गिक पर्यटनाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी केशव सृष्टी हे एक उत्तम ठिकाण आहे.

केशव सृष्टी हे फक्त एक सुंदर हिरवेगार उद्यान नाही, तर इथे तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता, औषधी वनस्पतींच्या बागांना भेट देऊ शकता आणि नैसर्गिक रस्त्यांवरून फिरू शकता. तुमच्या मुलांना पर्यावरणपूरक राहणीमान आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी केशव सृष्टी हे उत्तम ठिकाण आहे. याव्यतिरिक्त भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या केंद्राला भेट देऊ शकतात. (Uttan Beach)

(हेही वाचा – best beach resorts in goa for couples : तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवायचेत? मग हे आहेत गोव्यातील best beach resorts)

केशव सृष्टी इथे कसं पोहोचायचं?

केशव सृष्टी हे उद्यान उत्तन गावाच्या मध्यभागी आहे. इथे पोहोचण्यासाठी उत्तन-गोराई मार्गाने जाऊ शकता.

उत्तन लाईट हाऊस

उत्तन लाईट हाऊस हे एका छोट्या टेकडीवर वसलेलं आहे. या लाईट हाऊसवरून अरबी समुद्राचं भव्य दृश्यं दिसतं. तसंच समुद्रावरून वाहत येणारे आल्हाददायक वारे तुमचं मन सुखावतात. या ठिकाणाहून तुम्ही सूर्यास्ताचाही आनंद घेऊ शकता.

लाईट हाऊसवरून दिसणारं सूर्यास्ताचं दृश्यं हे समुद्राच्या लाटांमुळे चित्तथरारकही भासतं. प्रोफेशनल फोटोग्राफर्स आणि निसर्ग प्रेमींसाठी आपल्या फोटोंचं कलेक्शन वाढवण्यासाठी उत्तन इथलं लाईट हाऊस हे योग्य ठिकाण आहे.

उत्तन लाईट हाऊसपर्यंत कसं पोहोचायचं?

उत्तन लाईट हाऊस इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला डोंगरी रस्त्याने जावं लागेल.

उत्तनला भेट देण्यासाठी काही टिप्स
  • उत्तन हे एक किनारपट्टीचं गाव आहे म्हणून इथल्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी जाताना सनस्क्रीन, सनग्लासेस आणि आरामदायी फुटवेअर सोबत घेऊन जा.
  • जर तुम्हाला सीफूड आवडत असेल तर थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर समुद्र किनाऱ्याजवळील लहान फूड स्टॉल्सवर जाऊन ताजे मासे, कोळंबी आणि स्थानिक कोकणी शैलीतल्या अन्नपदार्थांचा आस्वाद घ्या.
  • इथल्या काही रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्समध्ये डिजिटल व्यवहार करता येतात. तर लहान दुकानांत आणि स्थानिक बाजारपेठेत फक्त रोख रकमेने व्यवहार करता येतात.
  • फिरताना स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची बाटली कायम सोबत घेऊन चला. (Uttan Beach)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.