-
ऋजुता लुकतुके
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे तिमाही निकाल मजबूत असतानाही चांगल्या आर्थिक कामगिरीनंतर हा शेअर मे महिन्यात गडगडला. मागच्या दोन आठवड्यात या शेअरमध्ये २.५ टक्क्यांची घसरण झाली. अखेर या आठवड्यात तो थोडासा सावरून ११,९१५ अंशांवर पोहोचला आहे. त्यात २१५ अंशांची उसळी पाहायला मिळाली आहे. (Ultratech Cement Price)
कंपनीने वर्षभरात १०% निव्वळ नफ्यात वाढ (२,४८२ कोटी रु) आणि १३% महसूल वाढ (२३,०६३ कोटी) नोंदवली असली, तरी शेअर बाजाराने तीव्र अपेक्षा आधीच “प्राइस इन” केल्या होत्या, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विश्लेषकांच्या मते, तुलनेत स्थिर ईबिटा प्रति टन आणि मर्यादित ऑपरेटिंग मार्जिनमुळे गुंतवणूकदारांना आश्चर्याचा फारसा लाभ झाला नाही. शिवाय, सिमेंटच्या किमतीतील अस्थिरता लक्षात घेता अनेक गुंतवणूकदारांनी नफारुपी विक्रीकडे मोर्चा वळवला. (Ultratech Cement Price)
(हेही वाचा – India Turkey Trade : भारतीय विमान कंपन्या तुर्कीबरोबरचा करार रद्द करतील का?)
इथून पुढे मात्र या शेअरमध्ये काही संशोधन कंपन्या सकारात्मक आहेत. मोतीलाल ओस्वाल यांनी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये १३,९०० रुपयांचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार, अल्ट्राटेक कंपनीचं निव्वळ कर्ज आर्थिक वर्ष २०२७ मध्ये १०५.३ अब्ज रुपये इतके असेल. हे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी असेल. म्हणजेच कंपनीची स्थिती सुधारलेली असेल. (Ultratech Cement Price)
जेएम फायनान्शिअलनेही अल्ट्राटेक बाबत सकारात्मक मत व्यक्त केले असून, ते सिमेंट क्षेत्रातील त्यांची ‘टॉप पिक’ कंपनीआहे. त्यांनी लक्ष्य १३,००० वरून वाढवून १३,५०० केलींआहे. क्षमतेतील वाढ आणि ३०० रुपये प्रती टन इतकी खर्च कार्यक्षमता वाढ ही नफा आणि बाजारातील हिस्सा दोन्ही वाढवतील, असं जाणकारांचं मत आहे. नुवामा संशोधन संस्थेनं मात्र सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी टार्गेट किंमत ११,५७४ वरून थोडी वाढवून ११,८५९ केली आहे. (Ultratech Cement Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community