tikona fort trek : स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी बांधला होता तिकोना किल्ला; आता पावसाळ्यात ट्रेकर्सचा सर्वात आवडता आहे किल्ला

32
tikona fort trek : स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी बांधला होता तिकोना किल्ला; आता पावसाळ्यात ट्रेकर्सचा सर्वात आवडता आहे किल्ला

तिकोना किल्ल्याला वितंडगड किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. हा महाराष्ट्रातला मावळ प्रांतात असलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५०० फूट एवढ्या उंचीवर असून चहुबाजूंनी हिरवळ आणि निसर्गसौंदर्याने वेढलेला आहे. हा किल्ला ट्रेकर्स आणि साहसी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. संपूर्ण भारतभरातून पर्यटक इथे फिरायला येतात.

हा डोंगरी किल्ला १७ व्या शतकामध्ये मराठा साम्राज्यात बांधला गेला होता. आजूबाजूच्या संपूर्ण मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हल्ल्यांपासून स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला एका डोंगरावर बांधण्यात आला होता. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. त्याच्या भोवतालचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. (tikona fort trek)

तिकोना किल्ल्याचा थोडक्यात इतिहास

१७ व्या शतकामध्ये मराठा साम्राज्याच्या काळात हा तिकोना किल्ला बांधला गेला होता. शत्रूच्या हल्ल्यांपासून स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. पुढे ब्रिटीश राजवटीत हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात असे.

(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादी मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)

तिकोना किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ : पावसाळा (जून ते सप्टेंबर).

चढण : सोपे.

पायथ्याचं गाव : पेठ तिकोना.

नवशिक्या ट्रेकर्ससाठी चढण : सर्वोत्तम आहे.

तिकोना किल्ल्याची उंची : ३५०० फूट.

(हेही वाचा – वीर सावरकरांचा त्याग राष्ट्रासाठी प्रेरणादायक; Amit Shah यांची एक्सवर भावूक पोस्ट)

तिकोना किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं?

महाराष्ट्रातली दोन प्रमुख शहरं, मुंबई आणि पुणे इथून तिकोना किल्ला ट्रेक सहज उपलब्ध आहे.

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर इथे पोहोचण्यासाठी सर्वांत जवळचं रेल्वे स्थानक लोणावळा किंवा कामशेत आहे. तुम्ही तिकोना गावाला जाण्यासाठी शेअर्ड रिक्षा किंवा बसने जाऊ शकता. कामशेतहून तिकोना पेठला जाण्यासाठी दर तासाला बसेस जातात.

लोणावळ्यापासून तिकोना किल्ल्यापर्यंतचं अंतर सुमारे ३६ किलोमीटर एवढं आहे. तर कामशेतपासून सुमारे २० किलोमीटर एवढं अंतर आहे. (tikona fort trek)

तिकोना ट्रेकिंग ट्रेल ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकोना पेठपासून सुरू होते.

खाजगी वाहनाने प्रवास करायचा असेल तर मुंबईपासून तिकोना पेठपर्यंतचं अंतर हे सुमारे १२० किलोमीटर आहे. हे अंतर तीन तासांत पार करता येतं. पुण्यापासून ते तिकोना पेठपर्यंतचं अंतर हे सुमारे ५० किलोमीटर एवढं आहे. हे अंतर पार करायला सुमारे पावणे दोन तास लागतात.

तिकोना किल्ल्यावर ट्रेक सुरू करण्याआधी तुम्ही बेस व्हिलेजमध्ये पैसे देऊन आपली गाडी पार्क करू शकता. (tikona fort trek)

(हेही वाचा – Indian Army : आता तिन्ही दलाच्या सैनिकांवर एक अधिकारी अॅक्शन घेऊ शकणार ; केंद्र सरकारने अधिसूचना केली जारी)

तिकोना ट्रेकची चढाई

तिकोना किल्ल्याचा ट्रेक सोपा आहे. हबतरेक पूर्ण करून शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे दीड ते दोन तास एवढा वेळ लागतो. या ट्रेकमध्ये तीव्र चढाई आणि काही खडबडीत भूभाग आहे. म्हणून तुम्हाला कन्फर्ट ठेवतील असे बूट घाला. तसंच आपल्यासोबत भरपूर पाणी आणि नाश्ता घेऊन जाणं गरजेचं आहे. (tikona fort trek)

तिकोना किल्ल्याच्या ट्रेकचा मार्ग

तिकोना किल्ल्याचा ट्रेक हा तिकोना पेठ या पायथ्याशी असलेल्या गावातून सुरू होतो. इथून तुम्ही किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरून चालत जाऊ शकता. हा मार्ग सुव्यवस्थित असून यावरून चालणं सोपं आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास एवढा कालावधी लागतो. तसंच नवशिक्या ट्रेकर्ससाठी हा सोपा आणि आदर्श ट्रेक आहे.

तिकोना ट्रेकची सुरुवात घनदाट जंगलातून चढाईने होते. जसजसं तुम्ही वर चढता तसतसं तुम्हाला काही खडकाळ भाग आणि तीव्र चढण आढळतात. काही ठिकाणी पायऱ्याही आहेत. पावसाळ्यात या पायऱ्या गुळगुळीत असू शकतात. म्हणून त्या चढताना काळजी घेणं गरजेचं आहे. या पायऱ्या चढून तुम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकता. (tikona fort trek)

एकदा का तुम्ही किल्ल्यावर पोहोचलात की, तुम्हाला आजूबाजूच्या डोंगर-दऱ्यांचं मनमोहक दृश्य दिसेल. तसंच तुम्ही किल्ला एक्सप्लोर करू शकता. किल्ल्यावर असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांना आणि वास्तूंना भेट देऊ शकता. किल्ल्यावर एक लहान पाण्याचे टाके आणि युद्धात वापरल्या जाणाऱ्या काही तोफाही आहेत. किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर, तुम्ही पुन्हा बेस व्हिलेजमध्ये उतरू शकता. उतरणं हे चढाईच्या तुलनेने सोपं आहे. एकंदरीतच काय तर, तिकोना किल्ला ट्रेक हा एक उत्तम अनुभव आहे आणि नवशिक्या आणि अनुभवी ट्रेकर्सही अगदी योग्य आहे. (tikona fort trek)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.