कॅल्शिअमच्या समस्येवर ठरणार ‘हे’ रामबाण उपाय

92

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या अनेक सवयींमध्ये बदल झाले आहेत. अनेकांच्या झोपेच्या वेळेत, खाद्यपदार्थात, कामं करण्याच्या पद्धतीमध्ये दिवसागणिक वेगवेगळे बदल आढळून येतात. या सगळ्याचे वाईट परिणाम आरोग्यावर होतांना दिसतात. लोकांची अर्धी कमाई डॉक्टरांकडे खर्ची होते. अशातच कॅल्शिअमची कमतरता हा आजार सर्वांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आढळून येतो. कॅल्शिअमच्या कमीमुळे अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे कॅल्शिअमच्या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या – औषधं घेऊन कॅल्शिअमचं प्रमाण वाढवण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने हे प्रमाण वाढवणे कधीही चांगले. काही साधेसोपे उपाय करून आपण आपल्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवू शकतो. रोज नियमित व्यायाम, योग्य प्रमाणात पाणी पिणे, संपूर्ण आणि शांत झोप घेणे, फास्ट फूडचे प्रमाण कमी करून योग्य आहाराचे सेवन करणे, दिवसातील ८-९ तास सतत एका जागी बसून काम केल्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा सारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. तसेचअनेक आजार होऊ शकतात. म्हणून रोज जसा वेळ मिळेल तसा निदान १० ते १५ मिनिटं व्यायाम करणे. म्हणजेच धावणे, चालणे, योग करणे गरजेचे आहे.

(हेही वाचा केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर)

आपल्या शरीरासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य त्यावेळी पाणी पिण्याची आवश्यकता असते. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे आपण दिवसातून किमान ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आहारात हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खावे. यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.