‘या’ २० अ‍ॅप्समुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते! पहा संपूर्ण यादी…

126

अलिकडे आपण बॅंकेची कामे, पैसे ट्रान्सफर अशी सर्वच कामे आपल्या स्मार्टफोनद्वारे करतो. स्मार्टफोन खरेदी केल्यावर अनेकदा कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे बॅटकी काम करत नाही. स्मार्टफोन थोडा जुना झाली की, बॅटरी लगेच संपते अशी तक्रार अनेकांकडून केली जाते. परंतु अनेकदा तुमच्या फोनमधील अ‍ॅप हे बॅटरी लवकर संपण्यास कारणीभूत ठरतात.

( हेही वाचा : मुंबई ते अलिबाग सुसाट प्रवास बंद! काय आहे कारण?)

फोनची बॅटरी लवकर संपवणारे २० अ‍ॅप्स कोणते आहेत पाहूयात…

  1. फिटबिट
  2. वेरिजान
  3. उबेर
  4. स्काइप
  5. फेसबुक
  6. एअरबीएनबी
  7. बीगो लाइव्ह
  8. इंस्टाग्राम
  9. टिंडर
  10. बम्बल
  11. स्नॅपचॅट
  12. व्हॉट्सअ‍ॅप
  13. झूम
  14. युट्यूब
  15. बुकिंग डॉट कॉम
  16. अमेझॉन
  17. टेलिग्राम
  18. ग्राइंडर
  19. लाइक
  20. लिंक्डइन

या अ‍ॅप्समध्ये अतिरिक्त फिचरला चालवण्याची परवानगी असते. फोटो, वायफाय, लोकेशन आणि मायक्रोफोन याचा या अ‍ॅप्सला अ‍ॅक्सेस असतो परिणामी असे अ‍ॅप्स चालवण्यासाठी अतिरिक्त बॅटरीची गरज पडते. या सर्वांमध्ये केवळ इन्स्टाग्राम अ‍ॅपवर डार्क मोड ऑप्शन आहे त्यामुळे बॅटरी लवकर संपते.

काय काळजी घ्याल?

या अ‍ॅप्समार्फत स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्यास विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अ‍ॅप्समध्ये डार्कमोड सुरू करा, टाईम लिमिटेशन हा पर्याय सुरू करा. गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.