चॅलेंजर डीपमध्ये आहे समुद्रातील सर्वात अधिक खोली असलेली जागा

241
चॅलेंजर डीपमध्ये आहे समुद्रातील सर्वात अधिक खोली असलेली जागा

टायटॅनिक नावाचे बुडालेल्या जहाजाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा हल्लीच अपघात झाला, आणि त्यात असलेल्या लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता समुद्राच्या खोलीविषयी रहस्यांच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला आहे, दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही याचा शोध लावत आहे. पण तरीही समुद्रातील अशी कित्येक रहस्य आहेत ज्यांचा उलगडा अजूनही झालेला नाही. नॅशनल ओशनिक अँड ऍटमोस्फिअरीक ऍडमिनिस्ट्रेशनच्या मते गेल्या वर्षापर्यंत म्हणजेच 2022 पर्यंत संपूर्ण जगभरातील समुद्राचा फक्त 20% समुद्रतळ पहिला गेला आहे.

(हेही वाचा – ठाकरे गटाला महायुती देणार प्रत्युत्तर, ‘चोर मचाये शोर’, शनिवारी मुंबईत मोर्चा)

वूड्स होल ओशनग्राफिक्सच्या म्हणण्यानुसार समुद्राची खोली सुमारे साधारणपणे 12 हजार फूट इतकी आहे. समुद्राच्या सर्वात खोल असलेल्या भागाला ‘चॅलेंजर डीप’ असे म्हणतात. हे ठिकाण प्रशांत महासागरात मारियाना ट्रेंचच्या दक्षिण टोकावर आहे. याची खोली सुमारे 36 हजार फूट इतकी आहे. 1875 साली पहिल्यांदा या ठिकाणाचा शोध लावण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी खूप लोकांनी अनेक प्रयत्न केले पण ते असफल राहिले.

चॅलेंजर डीपची खोली इतकी जास्त आहे की इथे फक्त काळाकुट्ट अंधार आहे. सूर्यप्रकाश इथे पोहोचत नाही. या ठिकाणचे तापमान फ्रिजिंग पॉईंटपेक्षा थोडेच कमी आहे. या ठिकाणी पाण्याचे प्रेशर प्रति वर्ग 15 हजार पाऊंड इतके आहे. हे प्रेशर जमिनीवर असणाऱ्या प्रेशरपेक्षा एक हजार टक्के जास्त आहे.

हल्लीच बुडालेले टायटॅनिक पाहायला गेलेल्या पाणबुडीचा अपघात होऊन तीही समुद्रात बुडाली. इंटरगव्हरमेंटल ओशनग्राफिक्स कमिशन्सच्या म्हणण्यानुसार हल्ली बुडालेल्या पाणबुडीसारख्याच कितीतरी पाणबुड्या आणि जहाजे अशा खोल समुद्रात बुडालेले असावेत. याचा आकडा अंदाजे 3 मिलियनपर्यंत असू शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.