-
ऋजुता लुकतुके
मारुती बलेनोला टक्कर देणारी टाटा कंपनीची (Tata Company) गाडी असं टाटा अल्ट्रोझकडे पाहिलं गेलं. आणि आता कंपनीने २०२५ मध्ये गाडीचं नवीन मॉडेल आणतानाही बलेनोच्या तुलनेत काही महत्त्वाचे बदल गाडीत केले आहेत. यातील काही बदल हे फिचर आणि गाडीत प्रवास करताना येणाऱ्या अनुभवाविषयी आहेत. तर काही बदल हे सुरक्षाविषयक आहेत. या बदलांसह नवीन अल्ट्रोझ गाडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या अल्ट्रोझच्या तुलनेत नवीन बदल समजून घेऊया,
२०२० मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली ही गाडी टाटा मोटर्सच्या प्रिमिअम हॅचबॅक श्रेणीतील गाडी आहे. नवीन अल्ट्रोझ गाडीत आहे १०.२५ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले. मारुती बलेनो आणि आधीच्या अल्ट्रोझमध्ये डिस्प्ले ९ इंचांचा आहे. ॲपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो यांच्याशी तो जोडता येतो. नवीन गाडीत चालकाच्या समोरही इतकाच मोठा डिस्प्ले असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवासाच्या माहितीबरोबरच यात मॅप्सचं मार्गदर्शनही समोरच मिळेल.
(हेही वाचा – National Herald Case : “लूटा है तो लौटाना है”; ईडीच्या दाव्यानंतर भाजपाने साधला निशाणा)
अल्ट्रोझच्या नवीन गाडीत वरच्या श्रेणीतील गाड्यांमध्ये मोठं सनरुफ देण्यात आलं आहे. आणि ते आवाजाचा वेध घेऊन उघडू किंवा बंद होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे आता गाडीत फास्ट चार्जिंग युनिटही जोडण्यात आलं आहे. त्यामुळे चालक आणि त्याच्या शेजारी बसणारा प्रवासी आपला फोन जलद गतीने चार्ज करू शकेल.
#TataMotors have released multiple teasers for the #Altroz facelift, which is set to launch on May 22, 2025. Take a look at the list of changes on the 2025 Altroz at #V3Cars.https://t.co/MqXmIHg1Z9#AltrozFacelift #2025Altroz pic.twitter.com/bGiofU4V7q
— V3Cars (@v3cars) May 12, 2025
(हेही वाचा – मुंबई ठरतेय भारताची Start Up ची राजधानी’; जाणून घ्या किती झाली गुंतवणूक)
नव्या अल्ट्रोझ गाडीत टाटा मोटर्सनी अँबियन्ट लायटिंगची सोयही केली आहे. एरवी या श्रेणीतील गाड्यांमध्ये आपण पाय ठेवतो, त्या भागातून मंद दिवे सोडलेले असतात. पण, अल्ट्रोझमध्ये सगळीकडे असलेला मंद प्रकाश लोकांचं नक्कीच लक्ष वेधून घेईल. मुंबई किंवा इतर शहरांमध्ये गाडी चालवणाऱ्यांना हवेतील प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे गाडीत एअर प्युरिफायर (Air purifier) बसवणं ही गरज बनली आहे. पण, अल्ट्रोझमध्ये कंपनीनेच तुम्हाला हे प्युरिफायर बसवून दिले आहेत. त्यामुळे गाडीतील हवा पुढे आणि मागेही खेळती राहू शकते.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाडीत ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. हा एक मोठा बदल गाडीत आहे. २२ मेला नवीन अल्ट्रोझ फेसलिफ्ट गाडी भारतात सगळीकडे उपलब्ध होईल. एक्स शोरुम ७ लाख रुपयांपासून ही गाडी उपलब्ध असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community