Dengue : डासांपासून वाचण्यासाठी काळजी घ्या आणि डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करा

148

डेंग्यूचा ताप हा डासाच्या संक्रमणामुळे होत असतो. मच्छर चावल्याने त्वरीत संक्रमण होते. काही निवडक उपाय करून डेंग्यूचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचा ताप पसरत चालल्याचे आपण ऐकतो. डेंग्यूच्या तापाची लक्षणे ही ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशा पद्धतीची असतात. मात्र अनेक जण आजही डेंग्यूच्या आजाराबाबत जागरूक नाहीत. अनेकांना हा साधा ताप असल्याचे वाटून दुर्लक्ष करतात. ज्यामुळे मोठ्या समस्येचे कारण ठरू शकते. डेंग्यूपासून वाचण्यासाठी डासांचे प्रजनन रोखणे आणि डासांनी चावण्यापासून स्वतःचा बचाव करणे महत्त्वाचे आहे. यासाठी नक्की काय करावे जाणून घ्या.

डासांनी चावू नये म्हणून संध्याकाळी साधारण ६ नंतर घरामध्ये डासांचा शिरकाव होतो अथवा खेळायला जाताना मुलांना आणि स्वतःलाही संपूर्ण अंगभर कपडे घालावे. जास्तीत जास्त शरीर झाकण्याचा प्रयत्न करावा. झोपताना तुम्ही नियमित मच्छरदाणीचा वापर करावा. चांगल्या सुरक्षेसाठी मच्छर चावणार नाहीत अशा क्रिमचा अंगावर उपयोग करावा.

डासांपासून सुरक्षित ठेवा घर

घरात डास वाढू नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात स्वच्छता पाळणे. स्वयंपाकघरात पाणी साठू देऊ नये ही सर्वात पहिली पायरी आहे. डेंग्यूचे डास पसरणार नाही याची काळजी घरापासूनच घ्यायला सुरूवात करा. जमलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास लवकर येतात आणि त्यामुळे वेळोवेळी पाणी स्वच्छ करा आणि कुठेही घरात पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.

(हेही वाचा Chandrayan- 3 : चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल आणि अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवेल)

दरवाजा आणि खिडकी बंद करा

दरवाजे आणि खिडक्या साधारण काळोख पडू लागल्यानंतर बंद करा. गरज नसेल तर अजिबात उघडे ठेऊ नका. एखादी खिडकी अथवा दरवाजा तुटला असेल तर त्वरीत नीट करून घ्या. डेंग्यूच्या साथीच्या दरम्यान तर अजिबात हा धोका पत्करू नका.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

लवकरात लवकर डेंग्यूबाबत माहिती मिळाल्यास तुम्हाला यावर लवकर उपाय करता येतात. अति ताप, डोकेदुखी, उलटी, डोळ्यांमधील जळजळ, मसल्स आणि सांधेदुखी अथवा शरीरावर आलेले रॅशेस याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. डेंग्यूची लक्षणे दिसायला लागल्यावर त्वरीत डॉक्टरांकडे जा आणि त्यावर औषधोपचार करा.

आपल्या मुलांना डासांपासून वाचवा

मुलं अधिक वेळ घराच्या बाहेर असतात. शाळा असो अथवा गार्डन असो, घराच्या बाहेर खेळायला जाताना मुलांना अधिक सांभाळावे लागते. त्यामुळे मुलांना संपूर्ण कपडे घाला आणि मच्छर हातावर न बसण्यासाठी क्रिम लावल्यानंतरच बाहेर पाठवा. याशिवाय डेंग्यूच्या साथीदरम्यान मुलांना घरीच अधिककाळ खेळायला लावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.