-
ऋजुता लुकतुके
स्वॉन एनर्जी ही नैसर्गिक वायू क्षेत्रात काम करणारी एक खाजगी कंपनी आहे. मुंबईत कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय आहे. मागच्या वर्षभरात कंपनीचे शेअर तब्बल ३२ टक्के म्हणजे २०० अंशांनी कोसळले आहेत. प्रत्येक तिमाहीत कंपनीची उतरती भाजणी सुरूच आहे. त्याची कारणं समजून घेऊया. मूळात ऊर्जा क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या मानाने या कंपनीची वर्षभरातील कामगिरी काहीशी निराशाजनक आहे. गुंतणूकदार एका क्षेत्रातील एका कंपनीचा विचार करताना नेहमीच त्या क्षेत्राचा तौलनिक अभ्यास करत असतात. पण, स्वॉन एनर्जीने या बाबतीत सर्वांना निराश केलं आहे. त्याच्या बरोबरीने काही इतरही मुद्दे आहेत. क्यूआयपीने काढून घेतलेली गुंतवणूक, सततच्या तिमाही निकालांनी केलेली निराशा, घटता महसूल आणि नफा यामुळे या शेअरला म्हणावा तसा उठाव येत नाहीए. आताही नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात शेअरमध्ये पडझड सुरूच आहे. महिनाभरात शेअर ३ टक्क्यांनी तर शुक्रवारी एकाच दिवसांत शेअर २० अंशांनी म्हणजेच ४.६५ टक्क्यांनी खाली आला आहे. (Swan Energy Share Price)
(हेही वाचा – Nita Mukesh Ambani Cultural Centre : फ्रेंड्स ऑफ एनएमएसीसी योजनेचे फायदे काय आहेत?)
वर म्हटल्याप्रमाणे क्यूआयपीने पैसे काढून घेतल्यामुळे शेअरमध्ये जोरदार घसरण झाली आहे. अलीकडेच कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंट अंतर्गत ३० अब्ज रुपये गोळा केले. प्रत्येक शेअरमागे त्यांनी ६७० रुपये ही किंमत लावली होती. या घडामोडीनंतर लगेचच एका देशी गुंतवणूकदार संस्थेनं आपले या कंपनीतील काही शेअर अचानक काढून घेतले. या मोठ्या विक्रीच्या सौद्यामुळे अर्थातच शेअरमध्ये मोठी घसरण झाली. (Swan Energy Share Price)
ऊर्जा क्षेत्रातील इतर शेअरच्या तुलनेत स्वॉन एनर्जीची शेअर बाजारातील कामगिरी ही उतार चढावांनी भरलेली आहे. त्याचा परिणाम गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होण्यात झाला आहे. कंपनीचा दीर्घ काळातील आलेख चांगला राहिला आहे. पण, सरत्या आर्थिक वर्षांत चारही तिमाहीतील कामगिरी निराशाजनक आहे. महसूल आणि नफ्यात झालेली घट काळजी निर्माण करणारी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरकडे पाठ फिरवली आहे. शेअरची किंमत आणि कंपनीवरील कर्ज यांचं गुणोत्तर वाढलेलं आहे. उलट शेअरमध्ये गुंतवलेल्या पैशावर मिळणाऱ्या परताव्याचं गुणोत्तर घसरत चाललं आहे. या सगळ्या घटकांचा प्रतिकूल परिणाम स्वॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर होत आहे. (Swan Energy Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना शेअरमधील खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community