Suzlon Energy Share Price : दोन महिन्यात ५५ टक्के वाढीनंतर ‘हा’ शेअर आता ८ टक्क्यांनी खाली

Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये सध्या मोठे उतार चढाव दिसत आहेत. 

56
Suzlon Energy Share Price : दोन महिन्यात ५५ टक्के वाढीनंतर 'हा' शेअर आता ८ टक्क्यांनी खाली
  • ऋजुता लुकतुके

ऊर्जा क्षेत्रातील सुझलॉन एनर्जी ही कंपनी सध्या मोठी कंत्राटं आपल्या ताब्यात ठेवून आहे. त्यामुळेच देशांतर्गत संशोधन संस्था जिओजितने या शेअरचा अभ्यास वाढवला आहे. अलीकडे सुझलॉन एनर्जीच्या शेअरची वाटचाल पाहता जिओजित संस्थेनं या आधी दिलेला ‘खरेदी करा’ चा सल्ला हटवून शेअर जमा करा’ असा नवीन सल्ला त्यांनी दिला आहे. पण, हा नवीन सल्ला देताना संस्थेनं शेअरचं लक्ष्य ७१ रुपयांवरून वाढवून ७७ रुपये केलं आहे. यातून संस्थेला असलेला कंपनीच्या कामगिरीचा विश्वास दिसून येतो. (Suzlon Energy Share Price)

शेअरमध्ये १७ टक्के वाढीचा अंदाज जिओजितने व्यक्त केला आहे. हा विश्वास अभ्यासकांना वाटतो तो कंपनीला मिळालेल्या नवीन ऊर्जा ऑर्डरमुळे. सुझलॉन एनर्जीकडे ५.५ गिगावॅट इतकी ऊर्जा पुरवण्यासाठी मागणी आहे आणि ती कंपनीने पूर्ण केली तर त्यांची वाढ ४१ टक्क्यांनी होणार आहे. ही वाढ चक्रवाढ गतीने आहे. त्यामुळेच शेअरमध्ये मागच्या महिनाभरात ९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या ६४.९९ रुपयांवर आहे. या आधीच्या वर्षांत कंपनीने ५७३ मेगावॅट इतकी वीज पुरवली आहे. (Suzlon Energy Share Price)

(हेही वाचा – India Tour of England : गौतम गंभीर इंग्लंडमधून अचानक मायदेशी परतला; गंभीरच्या अनुपस्थितीत कोण सांभाळणार प्रशिक्षकाची धुरा?)

New Project 2025 06 14T162849.091

या शेअरचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांना भीती वाटते ती ही ऑर्डर पूर्ण होण्याची. कारण, नवीन ऑर्डर गिगावॅटमध्ये आहे. हा उपक्रम आता मध्यम आकाराचा न राहता त्याचा आकार वाढणार आहे आणि हे आव्हान सुझलॉन कंपनीला झेपेल का ही शंका जाणकारांना वाटत आहे. गेल्यावर्षी कंपनीने आपली ऊर्जा निर्मिती क्षमता ११० टक्क्यांनी वाढवली आहे आणि आताही कंपनीला ती अशाच प्रमाणात वाढवावी लागणार आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीचा महसूल विक्रमी १,८२२ कोटी रुपयांवर होता. ही आणखी एक जमेची बाजू आहे. म्हणजेच गेल्यावर्षीपर्यंत कंपनीने मागणी पूर्ण करण्याच्या दिशेनं काम केलं आहे. (Suzlon Energy Share Price)

आर्थिक वर्ष संपवताना कंपनीकडे १,९८३ कोटी रुपयांची रोखता होती. या कामगिरीमुळे जिओजित प्रमाणेच नुवामा या संशोधन संस्थेनं देखील सुझलॉन शेअरवर होल्ड म्हणजे राखून ठेवा असा शिक्का मारला आहे. (Suzlon Energy Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.