एसयूव्‍ही उत्‍पादक Tata Motors साजरा करत आहे एसयूव्‍ही वारसाचा ऐतिहासिक टप्‍पा

आयसीई व ईव्‍ही एसयूव्‍हींच्‍या श्रेणीवर विशेष दर आणि जवळपास १.४० लाख रूपयांच्‍या फायद्यांसह 'किंग ऑफ एसयूव्‍ही' फेस्टिवल लाँच

382
एसयूव्‍ही उत्‍पादक Tata Motors साजरा करत आहे एसयूव्‍ही वारसाचा ऐतिहासिक टप्‍पा

टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक, तसेच भारतातील आघाडीची एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनी भारतातील रस्‍त्‍यांवर २ दशलक्षहून अधिक एसयूव्‍ही धावत असण्‍याचा अभिमानाने ऐतिहासिक टप्‍पा साजरा करत आहे. सफारी, हॅरियर, नेक्‍सॉन, पंच यांच्‍यासह जुन्‍या काळातील आयकॉनिक कार्स-सिएरा व सफारी यांचा समावेश असलेला व्‍यापक एसयूव्‍ही पोर्टफोलिओ हा टप्‍पा गाठण्‍यामध्‍ये साह्यभूत ठरला आहे. ही प्रत्‍येक प्रबळ एसयूव्‍ही सेगमेंटला परिभाषित करणारी ठरली आहे आणि एकत्रितपणे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासह टाटा मोटर्सच्‍या दर्जात्‍मक सुरक्षितता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्‍याप्रती समर्पिततेला सादर करतात. ज्‍यामुळे या वेईकल्‍स खऱ्या अर्थाने ‘किंग ऑफ एसयूव्‍ही’ आहेत. (Tata Motors)

१९९१ मध्‍ये भारतात पहिली एसयूव्ही टाटा सिएरा लाँच करण्‍यापासून २०१४ ऑटो एक्‍स्‍पोमध्‍ये भारतातील पहिली कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही संकल्‍पना नेक्‍सॉनचे प्रदर्शन ते पंचसह सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची नवीन श्रेणी सादर करण्‍यापर्यंत, तसेच ५-स्‍टार प्रमाणित बी-एनसीएपी व जी-एनसीएपी एसयूव्‍हींचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ असण्‍यासह टाटा मोटर्सने आपल्‍या फॉरेव्‍हर अग्रगण्‍य उत्‍साहासह देशातील एसयूव्‍ही श्रेणीला नव्‍या उंचीवर नेले आहे. (Tata Motors)

(हेही वाचा – हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी: Ramdas Athawale)

या खासप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”एसयूव्‍ही श्रेणीला समजून घेण्‍याची आणि प्रत्‍येक ग्राहकाच्‍या गरजेनुसार योग्‍य उत्‍पादन देण्‍याची आमची क्षमता आम्‍हाला विभागामध्‍ये सातत्‍यता व अग्रगण्‍य नेतृत्‍व कायम राखण्‍यास मदत करते. आमच्‍या मल्‍टी पॉवरट्रेन धोरणाच्‍या पाठबळासह आमचा भारतातील ग्राहकांना प्रबळ, सुरक्षित व तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत जागतिक दर्जाच्‍या एसयूव्‍ही देण्‍याचा दृष्टिकोन आहे. २ दशलक्ष एसयूव्‍ही विक्रीचा टप्‍पा गाठण्‍यामधून हा दृष्टिकोन दिसून येतो आणि एसयूव्‍ही श्रेणीच्‍या भावी विकासासाठी गती स्‍थापित करतो.” (Tata Motors)

या यशाला साजरे करत आम्‍हाला किंग ऑफ एसयूव्‍ही फेस्टिवलसह ग्राहकांसोबत हा उत्‍साह शेअर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आमच्‍या प्रमुख एसयूव्‍ही हॅरियर (१४.९९ लाख रूपये) व सफारी (१५.४९ लाख रूपये) यांच्‍या सुरूवातीच्‍या किमतींमध्‍ये सुधारणा केली आहे आणि लोकप्रिय एसयूव्‍ही व्‍हेरिएण्‍ट्सवर जवळपास १.४ लाख रूपयांचे फायदे दिले आहेत. इलेक्ट्रिक वेईकल्‍ससंदर्भात Nexon.ev वरील अभूतपूर्व फायद्यांनी (जवळपास १.३ लाख रूपये) या वेईकलला सर्वाधिक उपलब्‍ध करून दिली आहे. यासोबत, Punch.ev देखील जवळपास ३०,००० रूपयांच्‍या फायद्यासह ऑफर करण्‍यात आली आहे. तसेच, रस्त्‍यावर ७ लाख नेक्‍सॉन्‍सच्‍या ७ इन ७ सेलिब्रेशनने वेईकलच्‍या लोकप्रिय मागणीमध्‍ये अधिक वाढ केली आहे.” अधिक माहितीसाठी, आजच जवळच्‍या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या.
कृपया लक्षात ठेवा : या सेलिब्रेटरी ऑफर्स ३१ जुलैपर्यंतच्‍या सर्व बुकिंग्‍जवर वैध आहेत. अटी व नियम लागू. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.