वाइन हे द्राक्षांच्या आंबलेल्या रसाच्या मदतीने बनवलं जाणारं एक अल्कोहोलिक पेय आहे. वाइन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी द्राक्षं ही साध्या द्राक्षांपेक्षा वेगळी असतात. साधी द्राक्षे वाळवून त्यांच्या मनुका तयार करता येतात किंवा त्याचं ज्यूस तयार केलं जाऊ शकतं. तसंच सध्या द्राक्षांना बिया नसतात आणि ती आकाराने मोठीही असतात.
वाइन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्राक्षांपेक्षा त्यांच्यात आम्लता आणि साखरेचं प्रमाण कमी असतं. तर याउलट वाइन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी द्राक्षं ही आकाराने लहान आणि गोड असतात. तसंच त्यांत भरपूर बिया असतात.
वाइन हे एक सुंदर पेय आहे. ते पूर्णपणे एक नैसर्गिक उत्पादन आहे. सुला व्हाइनयार्ड्समध्ये भारतातली सर्वांत उत्तम अशी वाइन तयार केली जाते. त्या वाइनमध्ये कोणत्याही प्रकारचे अॅडिटिव्ह नसतात. तसंच ती व्हेगन आणि ग्लूटेन-मुक्त देखील असते. उच्च दर्जाच्या वाइनमेकिंग सिस्टीमचा वापर करून इथे व्हाईट वाइन, रेड वाइन आणि रोझ वाइन तयार केल्या जातात. (Sula Vineyard)
(हेही वाचा – Trirashmi Caves : त्रिरश्मी लेण्या सांगतात बुद्ध व जैन समाजाचा इतिहास! वाचा काय आहे सत्य?)
सुला वाईनचं वैशिष्ट्य काय आहे?
सुला वाइन ही ताज्या द्राक्षांचा वापर करून तयार केली जाते. द्राक्षांची कापणी झाल्यानंतर ती साधारणपणे १२ ते १४ तासांच्या आत वाइनरीमध्ये आणली जातात. त्यानंतर ती विशिष्ट वाइन तयार करण्यासाठी आंबवली जातात आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. सुला वाइनयार्ड्स इथे तयार करण्यात येणाऱ्या दर्जेदार वाइन्स या तीसपेक्षा जास्त देशांमध्ये विकल्या जातात.
इथल्या वाइन्स जागतिक स्तरावर एवढ्या प्रसिद्ध आहेत की, जिथे वाइनच्या बाबतीत जगातले काही कठोर कायदे असलेल्या युरोपियन युनियनमध्येही त्या विकल्या जातात. सुला वाइनयार्ड्स इथे पोर्ट वाइनपासून ते रासा वाइनपर्यंत सगळ्या प्रकारच्या आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या वाइन तयार केल्या जातात. पोर्ट वाइनची किंमत ₹२५० प्रति बाटली आहे. तर रासा वाइनची किंमत सुमारे ₹२००० प्रति बाटली आहे. सुला वाइनयार्ड्स इथे प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रकारची वाइन उपलब्ध असते. नाशिक इथे असलेली सुला वाइनरी ही भारतातली सर्वांत मोठी आणि सर्वाधिक पुरस्कारप्राप्त वाइन ब्रँड बनली आहे. (Sula Vineyard)
(हेही वाचा – काश्मीर प्रश्नात Donald Trump यांची उडी ? म्हणाले, “आता मी …”)
वाइन बनवण्याची मूलभूत प्रक्रिया कोणती आहे?
वाइन उत्पादन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी फक्त थोड्या प्रमाणात मानवी हस्तक्षेपाची गरज असते. सुला इथल्या व्यावसायिकांनी जागतिक दर्जाच्या तंत्रांचा वापर करून निसर्गाने आधीच जे काही दिलं आहे, त्यात थोडासा बदल घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं आहे.
वाइन तयार करण्याचे पाच मूलभूत टप्पे आहेत. त्यांमध्ये कापणी करणं, क्रशिंग आणि प्रेसिंग करणं, किण्वन प्रक्रिया, शुद्धीकरण, काही वाइनच्या बाबतीत साठा करून वाइन जुनी करणं आणि शेवटी बाटलीबंद करणं या गोष्टींचा समावेश आहे. प्रक्रियेच्या काही विशिष्ट टप्प्यांतल्या फरकांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन तयार करता येतात.
कापणीच्या हंगामामध्ये सुमारे ५०० शेतकरी त्यांच्या शेतातली द्राक्षं वाइनयार्ड्समध्ये घेऊन येतात. हीच द्राक्षं वाइन उत्पादनासाठी वापरली जातात. एकत्र गोळा केलेली सगळी द्राक्षं त्यांच्या पांढऱ्या आणि लाल रंगांनुसार विभागली जातात. त्यानंतर पांढरी द्राक्ष सुलाच्या न्यूमॅटिक बलून प्रेसमध्ये क्रश केली जातात, तर लाल द्राक्ष क्रशिंग पॅडवरच्या डी-स्टेमरमध्ये क्रश केली जातात. (Sula Vineyard)
(हेही वाचा – भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !)
द्राक्षांचा रस गोळा झाल्यानंतर तो तळघरामध्ये गाळण्यासाठी सुलाच्या टाक्यांमध्ये साठवला जातो. या टाक्यांची क्षमता सुमारे १,३५,००० लिटर एवढी असते. प्रत्येक टाकीमध्ये १,५०,००० पेक्षा जास्त बाटल्या भरतील एवढी वाइन साठवली जाते. याच टाक्यांमध्ये किण्वन प्रक्रिया देखील होते. या प्रक्रियेमध्ये द्राक्षांच्या रसातल्या साखरेचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं.
बॅरलिंग आणि एजिंग प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर, असा एक समज आहे की, प्रत्येक वाइन जितकी जास्त जुनी असेल तितकी चांगली असते. पण तसं पाहता ९५% पेक्षा जास्त वाइन पहिल्या काही वर्षांतच वापरण्यासाठी तयार केल्या जातात. विशेषतः पांढऱ्या वाइन.
रेड वाइन थोड्या जास्त काळासाठी साठवल्या केल्या जाऊ शकतात. पण फारच कमी वाइन खूप जास्त काळासाठी साठवल्या जातात जातात. १० वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत साठवता येणाऱ्या रेड वाइनचं असंच एक उदाहरण म्हणजे, सुला रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन होय. तसंच फ्रेंच ओक बॅरलमध्ये चार महिने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ साठवल्या जाणाऱ्या व्हाईट वाइनचं उदाहरण म्हणजे डिंडोरी रिझर्व्ह चार्डोने होय. ओकमुळे वाइनला त्याचा पोत आणि त्याचा क्रिमी टेक्श्चर मिळतो. (Sula Vineyard)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community