Street Food : ‘या’ टिप्स वापर करा आणि तुमच्या मुलांना स्ट्रीट फूडपासून दूर ठेवा

93

मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते जंक फूड खाण्याचा हट्ट करू लागतात. पिझ्झा-बर्गर आणि कँडीची चव त्यांना खूप भुरळ पाडते. यामुळे मुले निरोगी आणि पौष्टिक पदार्थ खाणे बंद करतात. त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांना या गोष्टींपासून वाचवले पाहिजे.

खाण्याच्या सवयी बदला

मुलांचे जंक फूड खाणे बंद करायचे असेल, तर सर्वप्रथम त्यांच्या खाण्याच्या सवयी बदला. हे थोडे कठीण असू शकते, परंतु हळूहळू मुलांमध्ये निरोगी अन्न खाण्याची सवय लावा. जेणेकरुन त्यांना योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळू शकतील.

आवडीचे निरोगी अन्न बनवा

जर तुमच मूल बाहेरच स्ट्रीट फूड खाण्यासाठी हत्ती करत असेल तर त्यांच्या आवडीच्या आरोग्यदायी गोष्टी बनवा. त्यांना आवडणारे मसाले वापरा. दही, सॉस यांसारख्या चवदार मोहक गोष्टी सॅलडसोबत सर्व्ह करा.

(हेही वाचा BMC : वाटाघाटी न करता थेट कंपनींची नावे जाहीर; महापालिका प्रशासनाकडून आजवरच्या प्रथा आणि परंपरेलाच छेद)

सवयी बदलण्यास सुरुवात करा

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जितक्या लवकर बदल करायला सुरुवात कराल तितकाच फायदा होईल, नाहीतर काही काळानंतर मुलांना त्यांच्या सवयी बदलता येणार नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा मुलांच्या आहारात बदल कराल तेव्हा त्यांना त्याचे फायदे समजावून सांगा.

जेवणाचे टाईम शेड्यूल करा

मुलाच्या जेवणाची वेळ निश्चित करा. संपूर्ण आठवड्यासाठी अशा मेनूचे अनुसरण करणे कठीण होऊ शकते. म्हणूनच दोन-दोन दिवसाचे जेवणाचे वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार त्यांना जेवण द्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.