Skoda Kodiaq 2025 : स्कोडाची ‘ही’ प्रिमिअर कार भारतात लाँचसाठी तयार

Skoda Kodiaq 2025 : स्कोडाच्या इतर गाड्यांच्या तुलनेत ही गाडी प्रशस्त असेल. 

458
Skoda Kodiaq 2025 : स्कोडाची 'ही' प्रिमिअर कार भारतात लाँचसाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

जवळ जवळ सगळ्याच जागतिक कार मेकिंग कंपन्यांनी सध्या भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. स्कोडानेही अलीकडेच काही धोरणात्मक नवीन निर्णय घेतले आहेत. भारतातून सुपर्ब आणि ऑक्टेविया या दोन गाड्या हद्दपार झाल्या आहेत. कंपनीची वाटचाल अधिक प्रिमिअर गाड्यांच्या दिशेनं होत आहे. कुशाक नंतर आता कंपनी भारतीय रस्त्यांसाठी कॅडियाकची तयारी करत आहे. आतापर्यंतची ही कंपनीची सगळ्यात प्रिमिअम श्रेणी असेल. एसयुव्ही प्रकारची ही गाडी १.५ लीटर इंजिन क्षमतेची असेल. (Skoda Kodiaq 2025)

ही गाडी हायब्रीड असेल. त्यामुळे १.५ लीटरच्या टीएमआय इंजिनाबरोबरच यात २५.७ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरीही असेल. ७ स्पीडचा गिअरबॉक्स असेल. याशिवाय कंपनीने ग्राहकांसाठी २.० लीटरच्या इंजिनाचा पर्यायही देऊ केला आहे. यातून २०१ बीएचपी शक्ती निर्माण होऊ शकेल. याशिवाय जागतिक स्तरावर कंपनीने डिझेल इंजिनाचा पर्यायही दिला आहे. भारत एक्स्पोमध्ये ही गाडी पहिल्यांदा लोकांसमोर आली होती आणि तेव्हापासून तिची चर्चा आहे. कारण, यात कंपनीने आधुनिक एक्यूबी ईव्हीओ आर्किटेक्चर वापरलं आहे. म्हणजे या गाडीत जागा प्रशस्त असेल आणि लेग रुम तसंच बसायची जागाही वाढवण्यात आली आहे. (Skoda Kodiaq 2025)

(हेही वाचा – BMC : दरदिवशी तीन मजल्याच्या इमारतीएवढा कचरा करतात मुंबईकर; आयुक्तांनी स्पष्ट केली भूमिका)

स्कोडाने आपल्या कॉडियाक गाडीची चित्र यापूर्वी अनेकदा प्रसिद्ध केली आहेत. त्यावरून आपल्याला डिझाईनची कल्पनाही येऊ शकते. गाडीची पुढची बाजू ही आधीच्या स्कोडा गाड्यांप्रमाणेच आहे. ग्रिल मात्र बदलण्यात आलं आहे. तर दिवेही आधुनिक एलईडी पद्धतीचे असतील. तर पॅनोरमिक सनरुफ या गाडीची शान वाढवणारं आहे. पण, गाडीतील डिजिटल डिस्प्ले हा १२.९ इंचांचा मोठा असणार आहे. (Skoda Kodiaq 2025)

शिवाय कोणत्या मोडमध्ये गाडी चालवायची यासाठी ड्राईव्ह सिलेक्टरही असणार आहे. चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी एडीएस प्रणाली गाडीत असेल. तसंच पॅनोरमिक सनरुफ असेल. ही गाडी कंपनी आधी युरोपीयन बाजारपेठेत आणेल. नंतरच ती भारतात येईल हे नक्की. तिची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टर या गाड्यांशी असेल आणि तिची किंमत ४१ लाख रुपयांपासून सुरू होईल. या आठवड्यातच गाडीचं बुकिंग सुरू होणार आहे. (Skoda Kodiaq 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.