Sita Gufa : काय? रावणाने सीतेला याच ठिकाणाहून पळवून नेलं? ती सीता गुंफा महाराष्ट्रात कुठे आहे?

31
Sita Gufa : काय? रावणाने सीतेला याच ठिकाणाहून पळवून नेलं? ती सीता गुंफा महाराष्ट्रात कुठे आहे?

भारत देश हा रहस्यांनी आणि चमत्कारांनी भरलेला आहे. मायावी गूढ गुहांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत भारतभरामध्ये एक्सप्लोर करण्यासाठी, मनसोक्त भटकण्यासाठी आणि रिसर्च करण्यासाठी बरंच काही आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणची माहिती सांगणार आहोत. त्या ठिकाणचं नाव आहे सीता गुंफा. (Sita Gufa)

सीता गुंफा ही फक्त पर्यटनासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा म्हणूनही महत्वाची आहे. ही गुंफा म्हणजे भारताच्या समृद्ध आणि प्राचीन संस्कृतीचं एक प्रतिष्ठित प्रमाणच आहे. इतिहासाच्या आणि आपल्या संस्कृतीच्या आशा प्रमाणांमुळेच आपण आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडलेले राहतो. (Sita Gufa)

(हेही वाचा – ‘Reserve Bank of India’ २० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार)

सीता गुंफेचा आढावा

महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती बस स्थानकापासून सुमारे ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर पंचवटी नावाचा परिसर आहे. या परिसरात ही सीता गुंफा आहे. वनवासाच्या काळात सीता माता भगवान श्रीरामांसोबत काही दिवस या गुहेमध्ये वास्तव्याला होत्या. (Sita Gufa)

या गुहेच्या मुख्य दालनात तुम्हाला भगवान श्रीराम, सीता माता आणि बंधू लक्ष्मण यांच्या मूर्ती पाहायला मिळतील. तर जवळच एका लहान गुहेमध्ये एक शिवलिंग आहे. ही लहान गुहा सीता मातेचं देवघर होतं. रावणाने सीता मातेला याच ठिकाणाहून पळवून नेलं होतं. (Sita Gufa)

रामायणातल्या कथांचा अभ्यास करण्यासाठी पंचवटी इथे पर्यटकांची खूप गर्दी जमते. या परिसरात पाच मोठाले वटवृक्ष आहेत. म्हणूनच या परिसराला पंचवटी असं संबोधण्यात येतं. (Sita Gufa)

(हेही वाचा – indo western dress for wedding : मुलींनो लग्न समारंभात indo western dress निवडताना होते दमछाक? मग हे ड्रेस निवडा आणि दिसा छान छान!)

सीता गुंफाचे सांस्कृतिक महत्त्व

सीता गुंफेचा रामायणाशी संबंध आहे म्हणून हिंदू धर्मामध्ये सीता गुंफेचं आध्यात्मिक महत्त्व आहे. (Sita Gufa)

ही प्राचीन गुहा एक पवित्र तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही भाविक भक्तगण येतात. (Sita Gufa)

आजच्या काळात सीता गुंफा हे एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आपल्या आराध्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण शेकडोंच्या संख्येने दररोज येतात. (Sita Gufa)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.