Science Colleges In Mumbai : मुंबईमधील टॉप सायन्स कॉलेज कोणकोणते आहेत? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा!

83
Science Colleges In Mumbai : मुंबईमधील टॉप सायन्स कॉलेज कोणकोणते आहेत? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा!

सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित (STEM) अशा विषयांत पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान केला जातो. ही महाविद्यालये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान आणि गणित यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करतात. विज्ञानाची पदवी घेत असलेले विद्यार्थी अनेकदा भौतिक जगाचा अभ्यास करतात, प्रयोग करतात आणि पद्धतशीर निरीक्षण आणि विश्लेषणाद्वारे ज्ञान प्राप्त करतात. (Science Colleges In Mumbai)

भारत देश आज चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. विज्ञान क्षेत्रात भारताची होत असलेली प्रगती पाहून विद्यार्थी देखील या क्षेत्राकडे आकृष्ट होत आहेत. विज्ञान शाखेत कारकीर्द करु पाहणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबईत उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणार्‍या संस्था उपलब्ध आहे. आज आपण मुंबईतील टॉप सायन्स कॉलेजबद्दल जाणून घेणार आहोत. (Science Colleges In Mumbai)

(हेही वाचा – बारामतीतील पराभवानंतर Ajit Pawar यांचा मोठा निर्णय! कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन केली उचलबांगडी!)

१. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई :

यूजीसी मान्यता प्राप्त.
बी.एससी पहिल्या वर्षाचे शुल्क : रु. ९,०००
सरासरी पॅकेज : रु. ६,००,०००.
सर्वोच्च पॅकेज : रु. २१,००,०००.
वैशिष्ट्य : उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते.

२. डी.जी. रूपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय :

बी.एससी पहिल्या वर्षाचे शुल्क: रु. ६,९६५
वैशिष्ट्य : पायाभूत सुविधांमध्ये सर्वोत्तम.

३. मिठीबाई कला महाविद्यालय, मुंबई :

एआयसीटीई आणि यूजीसी मान्यता प्राप्त.
बी.एससी एकूण फी : रु. २,७०,०००.
सर्वोच्च पॅकेज : रु. १९,००,०००.
वैशिष्ट्य : उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळखले जाते.

४. रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज, मुंबई :

यूजीसी मान्यता प्राप्त.
बी.एससी पहिल्या वर्षाचे शुल्क : रु. ८,४९५.
वैशिष्ट्य : सक्रिय सामाजिक जीवनाचा अनुभव प्रदान केला जातो.

५. जय हिंद कॉलेज :

यूजीसी मान्यता प्राप्त.
बी.एससी पहिल्या वर्षाचे शुल्क : रु. ९,९००.
वैशिष्ट्य : उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते.

६. सोफिया कॉलेज फॉर वुमन, मुंबई :

एआयसीटीई मान्यता प्राप्त.
बी.एससी एकूण फी : रु. ४७,३४०.
वैशिष्ट्य : उत्कृष्ट पायाभूत सुविधा.

७. आयआयटी मुंबई (भारतीय तंत्रज्ञान संस्था) :

आयआयटी मुंबई बीएस इकॉनॉमिक्स अभ्यासक्रम प्रदान करते.
पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज : रु. २१,८२,०००.
सर्वाधिक पॅकेज : रु. ३,६७,००,०००.
वैशिष्ट्य : ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. ही संस्था शैक्षणिक धोरणावर आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करते.

८. जेबीआयएमएस मुंबई :

जेबीआयएमएस एम.एससी अभ्यासक्रम प्रदान करते.
वैशिष्ट्य : प्लेसमेंटसाठी ओळखले जाते.

९. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स : 

टीआयएसएस सोशल सायन्ससह विविध अभ्यासक्रम प्रदान करते. हे केवळ विज्ञान महाविद्यालय नाही. मात्र येथे विज्ञानासंबंधी चांगल्या दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते.

१०. किशनचंद चेलाराम कॉलेज (केसी कॉलेज) :

केसी कॉलेज बीएससी अभ्यासक्रम प्रदान करते.
वैशिष्ट्य : सामाजिक जीवनासाठी ओळखले जाते. तसेच विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान देण्यावर लक्ष केंद्रित करते. (Science Colleges In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.