-
ऋजुता लुकतुके
रोलेक्स ही जगातील एक अव्वल घड्याळ निर्माण करणारी कंपनी आहे. प्रिमिअम, उच्च श्रेणीची घड्याळं बनवणारी ही कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीची परवडणारी किंवा स्वस्तातील घड्याळं हा मुद्दाच इथे दुरापास्त आहे. पण, त्यातही जर कमीत कमी किमतीची तीन घड्याळं निवडायची झाली तर रोलेक्स एअर किंग, रोलेक्स डेट जस्ट आणि रोलेक्स ऑईस्टर पर्पेच्युअल ही घेता येतील. काही वेळा जुन्या काळात बनलेली रोलेक्सची घड्याळं त्यांचे मालक कमी किमतीला रोलेक्सच्याच रिटेल दुकानांमध्ये विक्रीला काढतात. आणि अशी घड्याळं ५ लाख रुपयांपासून तुम्हाला मिळू शकतात. (Rolex Watches For Men)
२०२५ मध्ये देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार चढाव होत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढलेल्या असताना रोलेक्स कंपनीनेही यंदा घडाळ्यांच्या किमती वाढवल्या आहेत. पण, या लेखात तुम्हाला सर्वात कमी किमतीच्या ३ घडाळ्यांची माहिती देणार आहोत. (Rolex Watches For Men)
(हेही वाचा – Gloria Church पाडून पुन्हा नवीन का बांधलं? काय आहे खरा इतिहास?)
रोलेक्स एअर किंग : १९४५ मध्ये ग्रेट ब्रिटनची रॉयल एअर फोर्स स्थापन झाली, त्याच्या आनंदात ही मालिका रोलेक्सने बाजारात आणली. वैमानिक लोक तेव्हा हौसेनं हे घड्याळ घालायचे. काळ्या रंगाचं डायल, पांढऱ्या रंगात अरेबिक आकडे आणि १२ ऐवजी तिथे होकायंत्राची उत्तर दिशा दाखवणारा आतल्या बाजूने वळलेला त्रिकोण ही या घड्याळाची तेव्हापासूनची ओळख आहे. हे घड्याळ कुठलाही धक्का किंवा प्रहर सहन करू शकतं, त्याची मोडतोड होत नाही, असा या घड्याळाचा लौकिक आहे. त्याची किंमत सध्या ६.४७ रुपये इतकी आहे. (Rolex Watches For Men)
रोलेक्स डेटजस्ट : १९४५ साली रोलेक्स कंपनीने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. आणि तो साजरा करण्यासाठी कंपनीने डेटजस्ट हे घड्याळ बाजारात आणलं. यात १२ आकड्याच्या जागी रोलेक्सचा लोगो आहे. यात आकडे रोमन आहेत. पोलादासारखा या डायलचा रंग आहे. रोलेक्सने पहिल्यांदा तारीख आणि दिवस डायलमध्ये दिसेल असं तंत्रज्ञान आणलं होतं. नंतर या घड्याळाची डायल विविध आकारात आली आणि तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत गेली. या घड्याळाची सध्याची किंमत सुमारे ७.१० लाख रुपये इतकी आहे. (Rolex Watches For Men)
(हेही वाचा – Turkistan च्या विरोधात फास आवळण्यास सुरुवात; भारतीय मुत्सद्देगिरीला यश)
रोलेक्स ऑस्टर पर्पेच्युअल : रोलेक्सचं हे सगळ्यात कमी किमतीचं घड्याळ आहे आणि तरीही त्याची किंमत आहे ५.५७ लाख रुपये. ऑलिव्ह हिरव्या रंगाचं डायल हे त्या काळात खूप चर्चिलं गेलं. या घड्याळात तीन काटे आहेत. रोलेक्सच्या घड्याळातील स्प्रिंग आणि तबकडी यांचं पेटंटच रोलेक्सने घेतलं आहे. हेच घड्याळ सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टवर चढाई करताना वापरलं होतं. (Rolex Watches For Men)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community