Realme GT 7t : रियलमी जीटी ७ मालिकेवर ६,००० रुपयांपर्यंतची सूट कशी मिळवाल?

Realme GT 7t : रियलमी जीटी मालिकेत ७,००० एमएएच क्षमतेच्या बॅटरीचा फोन आहे.

37
Realme GT 7t : रियलमी जीटी ७ मालिकेवर ६,००० रुपयांपर्यंतची सूट कशी मिळवाल?
  • ऋजुता लुकतुके

आतापर्यंतची सगळ्यात तगडी बॅटरी आणि अक्षरश: मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होणारा फोन ही रियलमी जीटी मालिकेतील फोनची वैशिष्ट्य आहेत. कारण, या फोनची बॅटरी ७,००० एमएएच क्षमतेची आहे. फोनबरोबर १२० वॅट क्षमतेचा वायरलेस चार्जरही तुम्ही घेऊ शकणार आहात. त्यामुळे हा फोन फक्त १४ मिनिटांत ५० टक्क्यांच्या वर चार्ज होऊ शकतो. फोनचा प्रोसेसर आहे सर्वशक्तीमान मीडियाटेक डिमेन्सिटी ९,४०० ई चिपसेट. या वैशिष्ट्यांमुळे रियलमी जीटी मालिकेची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. आता कंपनीने फ्लिपकार्ट आणि रियलमी वेबसाईटवर हा फोन बुक करणाऱ्यांना ६,००० रुपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे. शिवाय एक्सचेंज ऑफरही आणली आहे. त्यामुळे लोकांचं लक्ष पुन्हा एकदा या फोनवर गेलं आहे. (Realme GT 7t)

कंपनीची ही सवलत ‘बेस्टसेलर डे’ची सवलत म्हणून लागू आहे. फोनचे फिचर पाहिलेत तर जीटी ७ फोनमध्ये वरील वैशिष्ट्यांबरोबरच ६.७८ इंचांचा मोठा एमोल्ड डिस्प्ले आहे. त्याची प्रखरताही ६,००० नीट्स इतकी आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे. मोबाईलमधील फोन हा सोनीचा आहे. हा फोन पाण्याखालीही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. तर व्हिडिओ घेताना तुम्ही ४के, ८के असा त्याचा दर्जा ठरवू शकता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तुम्ही फोटोतील ग्लेअर काढून टाकू शकता. आता फ्लिपकार्ट आणि वेबसाईटवर मिळणारी सवलत बघूया, (Realme GT 7t)

(हेही वाचा – Mahapalika Elections : शिवसेनेचा मास्टर प्लॅन! प्रलंबित कामांना गती देत शिवसेना उबाठावर कुरघोडी, ‘खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे…’)

रॅम + स्टोरेज मूळ किंमत (₹) सवलत (₹) सवलतीनंतरची किंमत (₹) ईएमआय (महिने)
८ जीबी + २५६ जीबी ₹३९,९९९ ₹३,००० / ₹५,००० एक्सचेंज ₹३४,९९९ ९ महिने
१२ जीबी + २५६ जीबी ₹४२,९९९ ₹३,००० / ₹५,००० एक्सचेंज ₹३७,९९९ ९ महिने
१२ जीबी + ५१२ जीबी ₹४६,९९९ ₹३,००० / ₹५,००० एक्सचेंज ₹४१,९९९ ९ महिने

 

रियलमी जीटी ७टी फोनचे फिचरही पाहूया,

७ जीटी आणि जीटी ७टी यांचे बहुतांश फिचर सारखे आहेत. पण, जीटी ७टी हा फोन काहीशा कमी किमतीला उपलब्ध आहे. या फोनमधील प्रोसेसर ही मीडियाटेक डिमेन्सिटी ८,४०० मॅक्स हा आहे. बाकी बॅटरी आणि चार्जिंगची क्षमता तीच आहे. या फोनमध्ये एआय ट्रान्सलेटर आणि एआय इरेझर हे दोन फिचर आहेत. जीटी मालिकेतील या दोन्ही फोनचा डिस्प्लेही सारखाच आहे. तर या फोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्लानर आहे. तसंच फोनचं तापमान नियंत्रित करणारी यंत्रणाही आहे. जीटी ७टी फोनची किंमत आणि त्यावर मिळणारी सवलत पाहूया, (Realme GT 7t)

(हेही वाचा – मे महिन्यात ६.४१ लाख कोटी रुपयांचे UPI Payment झाले; पी. चिदंबरम निशाण्यावर)

व्हेरिएंट मूळ किंमत (₹) सवलत (₹) सवलतीनंतरची किंमत (₹) ईएमआय कालावधी
८ जीबी + २५६ जीबी ₹३४,९९९ ₹३,००० / ₹६,००० एक्सचेंज ₹२८,९९९ ९ महिने
१२ जीबी + २५६ जीबी ₹३७,९९९ ₹३,००० / ₹६,००० एक्सचेंज ₹३१,९९९ ९ महिने
१२ जीबी + ५१२ जीबी ₹४१,९९९ ₹३,००० / ₹६,००० एक्सचेंज ₹३५,९९९ ९ महिने

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.